शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

'एनए' (जमीन) परवानगीचे अधिकार आता स्थानिक ग्रामपंचायतीला


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : कृषक जमिनीचा वापर अकृषक (नॉन एग्रीकल्चर झोन) कामासाठी करण्याकरिता आता ग्रामपंचायतींना अधिकार देण्यात आले असून गावापासून २०० मीटरच्या आत बांधकाम करताना स्वतंत्रपणे परवान्याची गरज नाही. महसूल विभागाने यासाठी शासन आदेश काढला आहे. आधी परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घ्यावी लागत होती. 


           --महसूल विभागाचा आदेश राज्य सरकारचा निर्णय--


            कृषक जमिनीचा वापर अकृषक (नॉन एग्रीकल्चर झोन) कामासाठी करण्याकरिता अगोदर खूप किचकट अशी प्रक्रिया होती. व याकरिता साधारणपणे एक ते दीड वर्षाचा कालावधी जात होता. (Land NA Permission) आता अगोदरच्या पद्धतीनुसार आता याकरिता दोन प्राधिकरणांकडे अर्ज करण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचा विचार केला तर त्यानुसार ज्या जमिनीचा वापर शेतीसाठी करण्यात येतो किंवा करण्यात येत आहे अशा जमिनीचा वापर जर कृषी व्यतिरिक्त म्हणजेच अकृषीक करण्याकरिता करायचा असेल तर त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांचे परवानगी घ्यायला लागत होती. परंतु आता यामध्ये बदल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे

शासनाने घेतलेले या निर्णयामुळे आता ग्रामपंचायतकडे बांधकाम परवान्याच्या अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत मध्येच अकृषीक परवाना शुल्क भरून घेतले जाणार आहे. (Land NA Permission) याकरिता बांधकाम आणि विकसन परवानग्या देण्यासाठी बांधकाम परवानगी व्यवस्थापन ही ऑनलाईन प्रणाली वापरण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post