शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

कायद्याचे रक्षकच भक्षक : अनेक बडे अधिकारी यांच्या वर गुन्हे दाखल करण्यासाठी १ में महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर बेमुदत आमरण उपोषण


 स्मिता बाबरे (संपादक) 

महाराष्ट्र पोलीस न्युज

               पुणे इंदापूर : उपोषण कर्ते हनुमंत वसंत कदम रा. गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर, जि. पुणे. 

            गु.र.नं. ०६३२/२०२२ दिनांक १७/०८/२०२२ रोजी दाखल गुन्ह्यांमधील आरोपींचा पोलीस कारवाई व न्यायालयीन कारवाई पासून बचाव करण्यासाठी महत्वाच्या आरोपींना वगळून गुन्हे दाखल केलेले तपासी अधिकारी यांनी आपल्या नोकरीशी बेइमानी करून पोलीस दलाला काळीमा फासणारे कृत्य केल्याने सहा. पोलीस निरीक्षक महेश माने व प्रकाश पवार यांचे तातडीने निलंबन करून गुन्हे दाखल करावे. गुन्ह्यातून वगळण्यात आलेले आरोपी रवींद्र पिसे (उपअधीक्षक, भूमी अभिलेख, इंदापूर) ठाकरे (उपअधीक्षक भूमी अभिलेख, शिरूर) व इतर तसेच विजयकुमार परीट व बिचकुले (गटविकास अधिकारी, इंदापूर) व इतर.

            या गुन्ह्याच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी DYSP बारामती यांच्याकडे देण्यात यावी. गुन्ह्यांच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करून अटक करावी. यासाठी १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उपोषणास कदम यांनी सुरवात केली.

            हनुमंत कदम यांंनी निवेदनात असे म्हणाले की मा. विशेष पोलीस महानिरीक्ष फुलारी कोल्हापूर यांना विनंतीपूर्वक निवेदन सादर करतो की, मी आज रोजी दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी आपले अधिपत्याखालील इंदापूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण समोर आमरण उपोषणास बसत असून या बाबत आपणाला दि. १०/०४/२०२३ रोजी अर्ज पाठविलेला आहे. गु.र.नं. ०६३२ / २०२२ सदर गुन्ह्याच्या तपासाबाबत मी पोलीस निरीक्षक दिलीप पवार इंदापूर व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे तसेच अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे बारामती यांच्याकडे वारंवार जाऊन समक्ष भेटून चर्चा करून तक्रारी दाखल केल्या आहेत. 

             परंतु सदर गुन्ह्यातील आरोपींशी हात मिळवणी करणाऱ्या तपासी अधिकारी सपोनी महेश माने व सपोनी प्रकाश पवार यांचे पाठीशी ते ठाम उभे राहिले आहेत. 

            संबंधित आरोपी हे अधिकारी असल्याने गुन्हेगार असूनही त्यांना वाचविण्यात येत आहे. दि. १६/०४/२०२२ च्या माझ्या तक्रारीवर सपोनी पवार यांनी चौकशी करून दाखल गुन्ह्यातील आरोपींनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने दि. १७/०८/२०२२ रोजी गुन्हा दाखल केला.

            सदर गुन्ह्याचा तपास सपोनी पवार यांच्याकडे न ठेवता जाणून बुजून सपोनी माने यांच्याकडे दिला. माने इंदापूर पोलीस स्टेशनला रुजू झाल्यापासून सदर आरोपींशी त्यांचे लागेबांधे आहेत. या सर्व घटनेची आपणास प्रत्यक्ष भेटून कल्पना देण्यासाठी मी दिनांक १२/०४/२०२३ रोजीच्या पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण येथे आपल्या जनता दरबारामध्ये माझ्यावर होत असलेल्या अन्याय व छळाबाबत माझ्या व्यथा मांडण्याकरिता आपणाला समक्ष भेटण्यासाठी अंकित गोयल, आनंद भोईटे, गणेश इंगळे, दिलीप पवार यांना सांगितले परंतु त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.


👉🏻१) सदर गुन्ह्यातील आरोपींना पाठीशी घालणारे संबंधित पोलीस अधिकारी स. पो. नी. महेश माने व स.पो.नी. प्रकाश पवार यांचे निलंबन करून इन कॅमेरा खातेनिहाय चौकशी करून गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.


👉🏻२) सदर गु.र.नं. ०६३२ / २०२२ गुन्ह्याच्या तपासाची संपूर्ण जबाबदारी DYSP गणेश इंगळ यांच्याकडे सोपविण्यात येऊन गुन्ह्यातून वगळण्यात आलेल्या व गुन्ह्यामध्ये नमूद असलेल्या आरोपींवर गुन्हे दाखल करून गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करून प्रत्यक्ष कठोर कारवाई करावी.


👉🏻३) माझे राहत्या घराच्या जागेचा सिटीसर्व्हे जाणीवपूर्वक चुकीचा करून सदर जागेमध्ये रस्ता नसताना जाणून बुजून रस्ता दाखवील्यामुळे उपअधीक्षक भूमि अभिलेख व सिटीसव्हें अधिकारी / कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, सदस्य यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रत्यक्ष कठोर कारवाई करावी.


            इंदापूर पोलीस स्टेशनचे संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्या अर्थिक, शारीरिक, मानसिक छळाला कंटाळून मी आज रोजी दि. १ मे २०२३ रोजी महाराष्ट्र दिनी इंदापूर पोलीस स्टेशन समोर आमरण उपोषणास बसत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील याची नोंद घ्यावी.. असे निवेदन हनुमंत वसंत कदम यांनी दिले आहे. 

           या निवेदनात प्रामुख्याने कायद्याचे रक्षकच भक्षक झाले. पोलीस निरीक्षक दिलीप पवार, स.पो.नी. महेश माने, स.पो.नी. प्रकाश पवार यांनी आरोपींशी हात मिळवणी करून संगणमताने कटकारस्थान रचून माझे आमरण उपोषणा बाबत चुकीचे व दिशाभूल करणारे रिपोर्ट वरीष्ठिना पाठवीले याची इन कॅमेरा सखोल चौकशी करावी. अशी मागणी केली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post