शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अक्षय भालेराव यांच्या हत्येच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचा जनमोर्चा आंदोलन : उरुळी कांचन


 शुभांगी वाघमारे

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे हवेली (उरुळी कांचन) : रविवार, दि. ११ जून, २०२३ रोजी उरुळी कांचन, ता. हवेली जि. पुणे येथे नांदेड जिल्ह्यातील बोंडर हवेली या गावात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्यामुळे बौद्ध युवक अक्षय भालेराव यांची त्याच गावातील समाज कंटकांनी निर्घृणपणे हत्या केल्याच्या निषेधार्थ अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांना सामाजिक न्याय मिळावा या दृष्टीने रॅली आणि निदर्शने करत बाबासाहेब बडेकर आणि संदीप बडेकर यांच्या नेतृत्वाखाली जनमोर्चा आंदोलन करण्यात आले.

             जनमोर्चा आंदोलनात वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष कमलेश उकरंडे, महासचिव राहूल इनकर, उपाध्यक्ष सतिश साळवे, हवेली तालुका अध्यक्ष संजय साळवे, महासचिव संजय भालेराव, कार्याध्यक्ष केतन निकाळजे, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, सचिव महेश गायकवाड, संजय कांबळे, प्रसिद्धी प्रमुख सदाशिव कांबळे, सोरतापवाडी गण अध्यक्षा राणी भंडलकर, भारतीय बौद्ध महासभेचे बाबासाहेब कांबळे, विष्णू कांबळे, रेखा मखरे, समाज सेवक उत्तम शेलार, सुभाष गायकवाड, सिंधू मोरे, आकाश म्हात्रे, मानवहित लोकशाही पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष प्रदीप शेंडगे, पत्रकार दिगंबर जोगदंड, आरपीआय हवेली अध्यक्ष मारुती कांबळे, माजी शिक्षक बाळकृष्ण काकडे, विकास भालेराव, शोएब मनियार, अनिल साळवे, भीमराव घायवान, किरण कांबळे, तुषार भोसले, गणेश कांबळे, संतोष मोरे, उमेश शिरवाळे, अमोल सोनवणे, शेखर शिरवाळे, अशोक गाडे, परमेश्वर कदम, सचिन भालशंकर, शंकर भालेराव, विशाल जावळे, शिवराज साने यांची आंदोलनात  प्रमुख उपस्थिती होती.

            या प्रसंगी उरुळी कांचन पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना वंचित बहुजन आघाडी हवेली पूर्वच्या वतिने निवेदन देण्यात आले.

         जनमोर्चा आंदोलनात हवेली तालुक्यातील सर्व समविचारी पक्ष आणि संघटनेतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.



Post a Comment

Previous Post Next Post