शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

MHT - CET (PCB) परीक्षेत ९८.७४ गुण मिळवत व जीवशास्त्र विषयात ९९.८९ गुणांसह कु. स्वप्नाली कदमची गगन भरारी : इंदापूर तालुक्यात पहिली


 अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज



पुणे (इंदापूर) : दि.१२ अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (MHT - CET) - २०२३ चा निकाल सोमवारी सकाळी जाहीर झाला असून त्यात मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट या नामांकित शिक्षण संस्थेच्या अंकित असणाऱ्या राजमाता अहिल्याबाई होळकर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींनी बाजी मारत गगन भरारी घेतली आहे.

              यात कु. स्वप्नाली ब्रह्मदेव कदम हिला ९८.७४ गुण मिळाले आहेत. तसेच तिला जीवशास्त्र विषयात ९९.८९ गुण मिळाले असून इंदापूर तालुक्यात ती पहिली आली आहे. 

              या यशाने कु. स्वप्नालीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच विद्यालयातील कु. सानिका संजय चव्हाण हिला ८७.३५ गुण मिळाले आहेत. या विद्यार्थीनींनी कोणत्याही मोठ्या शहरांमध्ये खासगी शिकवणी न लावता इंदापूरात राहून अभ्यास, मेहनत व चिकाटीच्या जोरावरच घवघवीत यश संपादन केले आहे. या दोन्ही सावित्रीच्या लेकींच्या यशाने कॉलेजच्या नावलौकीकात भर पडली आहे.

            यावेळी कु. स्वप्नाली कदम, कु. सानिका चव्हाण या विद्यार्थीनींचा इंदापूरच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे यांनी पेढे भरवून सत्कार केला. आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस दोघींना शुभेच्छा दिल्या.

            यावेळी या दोन्ही मुलींसह मार्गदर्शक शिक्षक प्रा. सोमनाथ माने, प्रा. नामदेव गानबोटे यांचे प्राचार्या अनिता साळवे संस्थेचे उपाध्यक्ष तानाजी मिसाळ, सचिव ॲड. समीर मखरे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

Previous Post Next Post