सलमान मुल्ला
महाराष्ट्र पोलीस न्युज
उस्मानाबाद : कळंब चे सहाय्यक पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्या पोलिस पथकाने वाशी तालुक्यातील मांडवा येथे छापा टाकून १ लाख ९३ हजार ९५० रूपयांचे मुद्देमाल जप्त केला.
उस्मानाबाद जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक एम.रमेश यांच्या पोलिस पथकाने केली.
या प्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात तीन जनांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील संजय सुभाष पवार याच्या रहाते घरी गांजा अंमली पदार्थ असल्याची गुप्त माहिती माहिती पोलिसांना मिळाली. मांडवा येथील संजय सुभाष पवार याच्या घरी छापा मारला असता संजय सुभाष पवार (वय.२८) , सचिन सुरेश शिंदे (वय.१७), यांच्या घरात ५८ हजार ४८० रुपये किमतीचे ५ किलो ८४८ ग्राम गांजा, एक तलवार, चार सत्तुर, विदेशी दारू असे एकूण १ लाख १३ हजार ९५० रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कार्यवाही ही उस्मानाबाद पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधीक्षक नवनीत काॅंवत यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब पोलिस उपविभागीय अधिकारी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या नेतृत्वाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाणे, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, महिला पोलिस उपनिरीक्षक श्रीमती फंड , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय अतकरे, कराळे महिला पोलिस नाईक प्रतिभा मते, पोलिस नाईक सादेक शेख, नवनाथ खांडेकर, श्रीकांत भांगे, शाहरुखखाॅं पठाण, यादव महिला पोलिस नाईक चाटे, पोकाॅ करवर यांनी केली

Post a Comment