डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (देऊळगाव राजा) : डिग्रस बुद्रुक येथील मांटे परिवारातील तिघेजण पहाटे समृद्धी महामार्गावर मेहकर नजीक झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
डिग्रस येथील मांटे कुटुंबीय टाटा निस्सान क्र. एम. एच. २८ ए झेड ७५४६ ह्या वाहनाने कुटुंबातील लग्न लावून वाशिम येथून परत येत होते. दरम्यान फर्दापुर नजीकच्या चॅनेल क्र. २८३ जवळ वाहन थांबवून, त्यातील तिघे जण लघवी करण्यासाठी खाली उतरले त्याचवेळी मार्गावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात सिमेंट मिक्सर ट्रकने त्यांना उडविले.
या अपघातात विजय शेषराव मांटे, वय ४८, तुषार गजानन मांटे, वय ३४ व ओम विजय मांटे, वय २० हे तिघेजण या अपघातात मृत्यू झाले. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना मेहकर येथील सरकारी दवाखान्यात हलविले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांना मृत घोषित केले. एकाच कुटुंबातील वडील, मुलगा व पुतण्या ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजमन हेलावले आहे.
यातील विजय मानते हे विमा कंपनीचे काम करीत असल्याची माहिती मिळाली आहे तुषार हा अभियंता व ठेकेदारी करीत होता 'तसेच ओम हा अभियंत्रिकीच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती मिळाली आहे 'मृतक तुषार ची आज एमपीएससीची परीक्षा होती असे काही युवकांनी सांगितले आहे ' शवविच्छेदन झाल्यानंतर दुपारी एक वाजता दिग्रस येथील स्मशान भूमी पूर्तकावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे '

Post a Comment