शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून १ ठार तर ३ गंभीर जखमी


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हवेली) : लोणी काळभोर हद्दीतील रामदऱ्या जवळ आयोजित केलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान स्टेज कोसळून १ ठार व ३ गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना आज रविवारी (ता. ४) सायंकाळी साडेच वाजण्याच्या सुमारास घडली आहे.


बाळासाहेब काशिनाथ कोळी (वय ४६, राहणार निनाम पाडळी सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शुभम विजय लोखंडे (वय २४, धंदा नोकरी राहणार संगमनेर तालुका भोर जिल्हा पुणे), मयूर प्रमोद लोखंडे (वय-२५ धंदा शेती) व विकास वाल्मीक ढमाळे (वय-२४ राहणार पिंपरी वळण तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर) अशी जखमी झालेल्या तीन जणांची नावे आहेत.

                प्राप्त माहितीनुसार, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वडकी गाव येथे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास अचानक मुसळधार पाऊस व वादळ सुरू झाल्याने लोकांची धांदल उडाली. याच दरम्यान, पाऊस लागू नये म्हणून त्याच्याखाली वरील चार जन बसले होते. पावसामुळे स्टेजच्या लोखंडी पायऱ्यांचे रील चिखलात खचल्याने एका बाजूला पडले. आणि यामध्ये ४ जन जखमी झाले. जखमींना तातडीने सह्याद्री हॉस्पिटल उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यातील बाळासाहेब कोळी यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला अशी माहिती मिळत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post