शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या संकल्पनेतून पालखी मधील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी : इंदापूर


अतुल सोनकांबळे

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (इंदापुर) : दिनांक २२ रोजी जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निमित्त शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती. पद्माताई भोसले व सचिव डॉ. गिरीश देसाई यांच्या संकल्पनेतून पालखी मधील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी व उपचार, अल्पोपहार व चरणसेवा देण्यात आली.  

            शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत डॉ. सारंगी कुंभार, नर्स सानिका फुलारी, गौरी राठोड, केंद्र प्रमुख महादेव चव्हाण सर, भारत बोराटे सर यांनी ५०० पेक्षा जास्त वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करून औषधे दिली. 



        ‌.   या वेळी सर्व वारकर्यांना अल्पोपहार व चहा देण्यात आला. वारकऱ्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने चरणसेवा करण्यात आली.  शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून गेली ३ वर्षे वारकरी सेवा चालू आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे मा. विजयराव कुलकर्णी, मधुरा कुलकर्णी, राकेश फडतरे साहेब, ट्रस्टचे खजिनदार मा. तुषार रंजनकर, मीनल रंजनकर, ट्रस्टचे विश्वस्त अरविंद गारटकर, संस्थेचे सल्लागार हमीद भाई आत्तार, संतोष नरुटे, ट्रस्टचे इन्चार्ज दिपक जगताप, जावेद हबीब अकॅडेमी चे प्रमुख अमोल राऊत, फॅशन डिझायनिंग डिपार्टमेंट च्या हेड त्रिशला पाटील, कर्मचारी पूजा जाधव, तेजश्री देवकाते, अभिजित साळुंके, भरत माने, गायत्री झगडे व संस्थेचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.



               या प्रसंगी उपस्थित इंदापूर अर्बन बँकेचे संचालक मच्छिंद्र शेटे पाटील,   धनंजय कळमकर, कैलास पवार, तात्याराम पवार या सर्वांच्या शुभहस्ते वारकऱ्यांची सेवा झाली.

Post a Comment

Previous Post Next Post