डॉ. गंगाराम उबाळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा (सिंदखेडराजा) : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील मलकापूर पांग्रा येथे जून महिन्यामध्ये पावसाळा असतोच त्या दृष्टिकोनातून पावसाळ्यामध्ये विशेषता ओलसर जागेमध्ये अनेक मच्छराचा प्रादुर्भाव हा होत असतो. आणि हे टाळण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मलकापूर पांग्रा यांच्या वतीने डासापासून होणारे विविध आजार लक्षात घेता हिवताप जनजागर मोहीम जून २०२३ महिन्यात २२ या तारखे पासून सुरुवात करण्यात आली आहे.
यामध्ये आरोग्य विभागाच्या आशा कर्मचारी यांनी नेहमीचत रक्त नमुने घेणे त्वरित तपासणीसाठी देणे. कार्यक्षेत्रात डेंगू चिकन गुण्या या आजारा बाबत व जलजन्य आजारा बाबत सतर्क राहणे, संसर्ग बाबत कळविणे आवश्यक गावात ग्रामपंचायतच्या मदतीने गप्पी मासे पैदास केंद्र बनविणे.
आपल्या घरी सॅम्पल टास उत्पत्ती कंटेनर घेऊन पडताळणी करणे संडासच्या व्हेटपाईपला जाळी बांधणे बाबत नागरिकांना प्रवृत्त करणे कार्यशाळा च्या निमित्ताने मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा हिवताप कार्यालयाकडून प्राप्त हस्त पत्रिका वाचन वाटप करून गावा गावात जनजागृती करण्याचे आव्हान करण्यात आले. या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी डॉ. सदानंद बनसोड डॉ. गजानन मुळे, व आरोग्य अधिकारी डॉ. पवार, डॉ. ठोसरे आरोग्य सहाय्य श्री. रामप्रसाद नागरे व सर्व आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक उपस्थित होते.

Post a Comment