शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वेल्हे येथील दर्शना पवार खुन प्रकरणाचा पुणे ग्रामीण पोलीसांनी केला उलगडा : आरोपी केला जेरबंद


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे : दि. १८/६/२०२३ रोजी वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीतील गुंजवणे गावचे हद्दीत सतीचा माळ या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला होता सदर मृतदेहाचे शेजारी ओपो कंपनीचा मोबाईल फोन, काळे रंगाचा गॉगल तसेच काळया रंगाची बॅग व निळया रंगाचे जर्कीन अशा वस्तु मिळून आल्या होत्या. त्यावरून मृतदेहाची ओळख पटविली असता तो मृतदेह दर्शना दत्तू पवार वय २६ वर्षे रा. राजशी शाहू बँक नन्हे पुणे हिचा असल्याची व ती दिनांक १२/०६/२०२३ रोजी १०/०० वा सिंहगड किल्ला फिरण्यास जाते असे सांगून निघुन गेली होती ती परत आली नव्हती त्यामुळे तिचे वडील दत्ता दिनकर पवार यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशन येथे दि.१५/०६/२०२३ रोजी मानव मिसींग खबर दिली असल्याचे निष्पन्न झाले. 

             मृतदेहाचे शव विच्छेदनानंतर वेल्हे पो.स्टे. येथे ६१ / २०२३ भा.दं.वि.क. ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.

           सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून पुणे ग्रामीण पोलीसचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल व मा. अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणून आरोपी अटक करण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा व वेल्हे पोलीसांची विशेष पथके तयार केलेली होती.

         या गुन्हयाचा तपास करीत असताना तपास पथकास परिस्थितीजन्य पुरावे व प्रत्यक्षदर्शी साक्षिदारांकडून मिळालेल्या माहितीवरून सुधीर ऊर्फ राहुल दत्तात्रय हंडोरे, वय २८ वर्षे, रा. हिंगणे होम कॉलनी, दत्तमंदीराजवळ, कर्वेनगर, पुणे, मुळ रा. मु.पो.शहा, ता. सिन्नर, जि. नाशीक हा गुन्हयातील मुख्य संशयीत असल्याचे व तो गुन्हा घडल्यापासून पळून गेला असल्याचे निष्पन्न झाले.

            त्यावरून तपास पथकांनी संशयीत राहुल दत्तात्रय हांडोरे याचा शोध घेऊन अंधेरी रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतलेले असून त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. सदर गुन्हयातील आरोपीचा गुन्हा करण्यामागील मुख्य हेतु तसेच गुन्हयाचा घटनाक्रम याबाबत तपास चालू आहे गुन्हयाचा पुढील तपास मा. उप विभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले, हवेली विभाग हे करीत आहेत.

           या गुन्हयाचा तपास करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल, मा. अपर पोलीस अधीक्षक पुणे विभाग, मितेश घट्टे, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी, हवेली विभाग भाऊसाहेब ढोले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, स.पो.नि. राहुल गावडे, पो.स.ई. प्रदिप चौधरी, पो.हवा. रामदास बाबर, हेमंत विरोळे, राजू मोमीन, पो.ना. अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, तुषार भोईटे, मंगेश भगत, पो.कॉ.दगडु विरकर तसेच वेल्हे पो.स्टे. येथील स.पो.नि. मनोज पवार यांनी पो. हवा. योगेश जाधव, ज्ञानदीप धिवार, औदुंबर अडवाल, राहूल काळे, पो.ना. अजय शिंदे, पो.कॉ. आकाश पाटील, चा.पो.हवा. गणेश चंदनशिव, चा.पो.कॉ. ज्ञानेश्वर शेडगे, होमगार्ड विजय घोयने, विक्रांत गायकवाड व पोलीस मित्र संतोष पाटोळे यांची वेगवेगळी पथके तयार करून रवाना केलेली होती त्यांनी गुन्हयातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणलेला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post