शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

के.के. घुले विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दीन साजरा : अरुणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थे मार्फत


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हडपसर) : मांजरी बुद्रुक येथील शालेय विद्यार्थी दशेत असताना रोज योग प्राणायाम केल्याने मन प्रसन्न व बुद्धी तल्लख राहते. स्मरणशक्ती चांगली वाढते त्यामुळे अभ्यास व खेळात विशेष प्राविण्य मिळू शकते असे योग प्रशिक्षक अतुल रासकर यांनी सांगितले.

            अरूणदादा बेल्हेकर युवा राष्ट्र निर्माण संस्थेच्या वतीने कृष्णाजी खंडुजी घुले विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दीन साजरा करण्यात आला यावेळी रासकर बोलत होते.

          संस्था अध्यक्ष शैलेंद्र बेल्हेकर, स्वामी समर्थ मंदीर विश्वस्त विठ्ठल भापकर, पोलिस पाटील अमोल भोसले, योगप्रशिक्षक विजय चव्हाण, प्राचार्य एस. एस.पाटील, पर्यवेक्षक संजय हाके,भास्कर लोमटे, दिगंबर मेमाणे, निता जगताप, प्रज्ञा झगडे उपस्थित होते. यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामुहिक योग प्राणायाम केले योगाच्या विविध आसनाची प्रात्यक्षिके सादर केली.

Post a Comment

Previous Post Next Post