शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

'राजे क्लब' चा स्वच्छ वारी उपक्रम : संस्थापक अध्यक्ष अमित पवार


 सुनिल थोरात

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (शेवाळेवाडी) : श्री संत तुकाराम महाराज पालखी शेवाळेवाडी पासून कदमवाकवस्ती मार्ग लोणी काळभोर येथे मुक्कामास जाते. 

            शेवाळेवाडी येथे रोडच्या दुतर्फा पाणी, खिचडी, चहा, बिस्किटे, केळी अशा विविध प्रकारे वारकरी सांप्रदायांची सेवा करत असतात. 

             परंतु हिच सेवा घडताना तितकाच कचरा होतो त्याच अनुषंगाने सालाबाद प्रमाणे श्री संत जगदगुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर राजे क्लब च्या वतीने स्वच्छ वारीचे आयोजन करण्यात  आले होते. 

           पालखी मार्गस्थ झाल्यानंतर सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण झाला होता. हा कचरा साफ करण्यासाठी प्रशासनावर येणारा ताण कमी करण्यासाठी राजे क्लबच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



या उपक्रमामधे लहाण मुले, जेष्ठ नागरिक, तरूण वर्ग व महीलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. प्रत्येक जन पालखीमधे स्वतःच्या परीवारा सहीत सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. राजे क्लबच्या माध्यमातून आम्ही स्वच्छतेची सेवा करण्याचा दरवर्षी प्रयत्न करत असतो. असे राजे क्लबचे संस्थापक अध्यक्ष व शेवाळेवाडीचे माजी उपसरपंच अमित पवार यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post