सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : भारतीय जनता पार्टी व स्मितसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हडपसर येथे वारकर्यांना फराळ वाटप करण्यात आले.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या पालखीचे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित टाळ मृदंगाच्या गजरात हडपसरला आगमन झाले.
साला बादप्रमाणे स्वागतकक्ष उभारून वारकऱ्यांचे स्वागत व सेवा केली. स्मिता तुषार गायकवाड, उपाध्यक्ष - पुणे शहर भा.ज.पा. ओबीसी आघाडी, स्मितसेवा फौंडेशन - संस्थापक अध्यक्ष यावेळी संगीता पाटिल, आशा भूमकर, सीमा क्षीरसागर, माधुरी जगताप, भारती भुजबळ, अनिता धाबेवार, निकिता निंगाले, अंजली सोहा, काशीनाथ भुजबळ, अंकित कवाने इतर पधाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Post a Comment