सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक येथील श्री मांजराई देवी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. या पतसंस्थेच्या मार्फत पाणी व फराळ वाटप करण्यात आले.
पतसंस्था ही मांजरी बुद्रुक येथील शिवाजी चौकात पुर्वीपासून चालू होती. ही पतसंस्था नव्याने मांजरी फार्म, ज्ञान सिंधू आर्क्टिक येथे चालू करण्यात आली.
या पतसंस्थेचे माध्यमातून श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात पतसंस्थे मार्फत पाणी व फराळ पायी चालत जाणार्या वारकरी सांप्रदायिक यांना वाटप करण्यात आले.
संस्थेचे संस्थापक चेअरमन विजय घुले व संस्थेचे सेक्रेटरी दिपक कुचेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले.
यावेळी संस्थापक अध्यक्ष विजय घुले यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून भविष्यात सामाजिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगितले.
संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष विजय (नाना) घुले, सेक्रेटरी दिपक कुचेकर, संचालिका Adv कांचन वाळवेकर/सुतार, संचालक निलेश काळभोर, संचालिका सायली काळभोर, संचालक गणेश चोरमले, संचालक रामेश्वर खामकर, संचालिका कविता शेडगे, संचालिका स्मिता बाबरे, संचालिका श्रीमती अर्चना सरोदे, चेतन काळभोर, राहुल चांदणे व्यवस्थापक देवयानी सातारकर यावेळी उपस्थित होते.

Post a Comment