सुनिल थोरात
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : पूर्व हवेलीतील लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या महिला गावकामगार तलाठ्याच्या कामकाजाबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे गंभीर तक्रारीच्या अनुषंगाने लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या महिला तलाठी पद्मिनी मोरे यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली आहे.
पद्मिनी मोरे यांची उचलबांगडी करताच, गावगाड्यासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्तीच्या तलाठीपदाचा तात्पुरचा पदभार शिंदवने वळतीचे विद्यमान गाव कामगार तलाठी प्रदीप जवळकर यांच्याकडे. देण्यात आला आहे. अशी माहिती हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांनी दिली आहे. या वृत्तास हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनीही दुजोरा दिला आहे.
लोणी काळभोरच्या गावकामगार तलाठी मोरे यांच्याबाबत मागील कांही दिवसापासुन नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. एसआरओ कार्यालयातून आलेल्या ई म्युटेशनच्या फेरफाराची नोटीस भरायलाही विलंबाचा स्पीड ब्रेकर येत होता. तर नागरिकांना छोट्या-छोट्या कामासाठी वेठीस धरण्याचा प्रकार होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.
दरम्यान, पद्मिनी मोरे यांचे पती, तलाठी कार्यालयात बेकायदा थांबुन, मोरे यांच्याकडे येणाऱ्या महसूली कामासाठी वसुली करत असल्याच्या चर्चाही वरिष्ठ अधिका-यांपर्यंत पोहोचल्या होत्या. याबाबत हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे म्हणाल्या, “ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार लोणी काळभोरच्या अतिरिक्त तलाठी पद्मिनी मोरे यांचा पदभार काढून घेण्यात आला आहे.
लोणी काळभोर व कदमवाकवस्ती ग्रामपंचायती मधील नागरिक यांनी या कारवाईचे समाधान व्यक्त केले.
परंतु ज्या वरिष्ठांनी कारवाई केली तेच वरिष्ठ तलाठी पद्मिनी मोरे यांच्या पाठीशी उभे राहणार की भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश काढणार याकडे लोणी काळभोर व कदमवाकवस्ती मधील नागरिक लक्ष ठेऊन आहेत.

Post a Comment