सुशीलकुमार अडागळे
महाराष्ट्र पोलीस न्युज
(बारामती) : दि. १५ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे येथे संपन्न झालेल्या गुन्हे शाखेच्या बैठकीत पुणे जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला.
यामध्ये ऑक्टोबर २०२३ महिन्यातील तुलनात्मक कामगिरीने वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे यांची सर्वोत्तम कामगिरी केल्याचे निश्चित झाले. व याच आधारे "सर्वोत्तम पोलीस स्टेशन" म्हणून वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनची निवड करण्यात आली.
पोलीस स्टेशनचा द्वितीय क्रमांक देऊन सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी अभिनंदन केले. व भविष्यातही अशीच कामगिरी कराल अशी अपेक्षा व्यक्त केली. हा सन्मान घेण्यासाठी वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक सचिन काळे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या बैठकीसाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (बारामती विभाग), अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे (पुणे विभाग), यांच्यासह जिल्ह्यातील सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी तसेच जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment