शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

" रोटरी ग्रीन फॅक्टरी " कार्यशाळेचे आयोजन : बारामती


 मल्लिकार्जुन हिरेमठ

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (बारामत) : दि. ११ डिसेंबर रोजी रोटरी क्लब ऑफ बारामती व बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने  लघु-मध्यम उद्योजकांसाठी " रोटरी ग्रीन फॅक्टरी " कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

              त्यामध्ये सत्तरहून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला. वातावरणाचे वेगवेगळ्या प्रकारे होणारे प्रदूषण आणि त्यावरील उपाय या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. सौरऊर्जा व ते उभारणीसाठी लागणारे अर्थसहाय्य, हवा प्रदूषण व व्यवस्थापन , पाणी प्रदूषण व त्याचे व्यवस्थापन या विषयांवरील इत्यंभूत माहिती उपस्थितांना देण्यात आली. डॉ. राजेंद्रकुमार सराफ व शैलेश देशपांडे यांचे पाणी व्यवस्थापनवर, डॉ. प्रशांत खानखोजे यांचे वीज व्यवस्थापन व डॉ. नीता दोषी यांचे हवा प्रदूषणावर व्याख्यान झाले. 

             या कार्यक्रमाला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ च्या प्रांतपाल रो. मंजू फडके, सहायक प्रांतपाल रो. नितीन दोषी, ग्रीन फॅक्टरीज & ग्रीन सोसायटीचे संचालक रो. केशव ताम्हनकर, सहसंचालक रो. संतोष जोशी, रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या अध्यक्षा रो. दर्शना गुजर व इतर सदस्य , बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो. हणमंतराव पाटील यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post