सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे : दुचाकीस्वार महिलेकडून पैसे उकळल्या प्रकरणी वाहतूक पोलीस कर्मचारी पवार याचे निलंबन करण्यात आले. कोथरूड मधील नळस्टॉप सिग्नल चौकात दुचाकीस्वार महिलेला अडवून तुमच्या दुचाकीवर १० हजार रुपये दंड थकीत आहे असे सांगितले. आणि दंडाची ती थकीत रक्कम कमी करण्यासाठी तिच्याकडून ५०० रुपयांची लाच घेणाऱ्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला पुणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ. विजयकुमार मगर यांनी निलंबित केले आहे.
या संदर्भात निलंबित करण्यात आलेल्या लाचखोर पोलिस शिपायचे नाव संग्राम लक्ष्मण पवार असे आहे. तो पवार नामक वाहतूक पोलीस कोथरुड वाहतूक शाखेत नियुक्तीस आहेत.
असे पवार पुण्यातील अनेक भागात कार्यरत असून कधी दुचाकी, कधी तीन चाकी, कधी चार चाकी, तसेच अन्य वाहन चालकांकडून अशा पद्धतीने पैसे उकळत आहेत. अशा प्रकारे सर्व सामान्य जनतेला लुटणार्या सर्व पवारांना तात्काळ निलंबित करुन खातेनिहाय चौकशी करण्यात यावी असे नागरिक आपापसात चर्चा करत आहेत.
या प्रकरणातील लाचखोर पवार कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकात वाहतूक नियोजन करत असताना एक महिला दुचाकीवरुन निघाली असता. त्या महिलेला अडवून नेहमी प्रमाणे चौकशी अंती पवार नामक वाहतूक पोलीस यांनी त्या महिलेकडे थकीत दंडाची रक्कम मागितली. महिलेकडे दुचाकीची NOC नसल्याने तुम्हाला दहा हजार रुपये दंड होईल, असे पवारने यांनी सांगितले. महिलेने दंड भरण्यास असमर्थता दाखवल्याने पवारने तिच्याकडे १ हजार रुपयांची मागणी केली. महिलेने पैसे कमी करण्यास सांगितले. तेव्हा पवारने एका दुकानादाराकडे ऑनलाइन पद्धतीने ५०० रुपये जमा करण्यास सांगितले. महिला दुकानात गेली. तेव्हा दुकानदाराने तिला ५२० रुपये आॅनलाईनवर पाठविण्यास सांगितले.
याबाबतची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस उपायुक्त मगर यांनी चौकशीअंती पवार याला निलंबित करण्याचे आदेश मगर यांनी दिले.
अशा प्रकारे लाचखोर पोलीस लाच घेत असतील तर सर्व सामान्य नागरिक यांनी वरिष्ठांना तक्रारीरी कराव्यात. जेणे करून कर्तव्य करत असताना आपल्या जिवाची बाजी लावून कर्तव्य करणार्या पोलीसांची प्रतीमा मलीन होणार नाही.

Post a Comment