मधुकर बर्फे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
छत्रपती संभाजी नगर (पैठण) : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील बिडकीन येथे लहान मुलांकडून भिक मागण्याची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लहान मुलांकडून भिक मागुन घेणे कायद्याने गुन्हा आहे लहान बाळाला पोटाशी एका हाताने धरून आठ वर्षांची मुलगी दोन ते अडीच महिन्यांच्या नवजात बालकाला घेऊन पैठण तालुक्यातील बिडकीन बसस्थानक परिसरात गेली अनेक दिवसांपासून बस डेपो मध्ये प्रवाशांना केविलवाणी आवाजात भिक मागत पैशाची मागणी करताना दिसून येत आहे.
मानव अधिकारांचे हनन होत असुन रस्त्यावर भिक मागत असताना जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. ही गंभीर बाब असुन याकडे बिडकीन येथील स्थानिक पातळीवरील राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, पुढारी नेते मंडळी, बस डेपो अधिकारी, राजरोसपणे कानाडोळा करत आहेत.
लहान मुले खुलेआम भिक मागत असतानाही मुलांच्या पालका विरोधात कायदेशीर पाऊल उचलले गेले पाहिजे संबंधित अधिकारी यांनी या मुलांना बालसुधार केंद्र येथे दाखल करावे बाल संगोपन योजना महाराष्ट्र या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील अनाथ, निराधार, बेघर, आणि शारीरिक अपंग किंवा इतर समस्या असलेल्या मुलांच्या संगोपनासाठी मासिक अनुदान दिले जाते. त्यांच्या दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही

Post a Comment