शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"फुले दाम्पत्याच्या संघर्षमय जीवनप्रवास सत्यशोधक चित्रपट हडपसर मध्ये विशेष शो हाऊसफुल्ल"


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) : महात्मा फुले उभयतांचा प्रवास प्रेरणादायी - बाळासाहेब भिसे महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित प्रेरणादायी सत्यशोधक चित्रपटाचा विशेष प्रीमियर सो हडपसर येथील वैभव थिएटरमध्ये पार पडला. शिक्षकांच्या प्रचंड प्रतिसादामुळे हाउसफुल झाला.

              सत्यशोधक चित्रपटाच्या या विशेष प्रसंगी चित्रपटाचे कला दिग्दर्शक संदिप इनामके, सत्यशोधक फाऊंडेशनचे संजय टिळेकर  भारती तुपे, सविता मोरे, जयश्री चव्हाण, हरिभाऊ काळे, विठ्ठल सातव, नितिन आरु, गणेश फुलारे, बाळासाहेब हिंगणे, राजु डांगमाळी, प्रविण टिळेकर, चंद्रकांत टिळेकर, तुकाराम ससाणे सदर शो चे आयोजक एस. जी रावळगाव कारखान्याचे  बबनराव गायकवाड, निमंत्रक बाळासाहेब भिसे, हरिभाऊ काळे, अनिल मोरे, आदी उपस्थित होते.

               महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य व समाजासाठी योगदान मोलाचे होते, तळागाळातील दुर्लक्षित वंचित लोकांसाठी त्यांनी अखंड कार्य केले त्यांचा खरा इतिहास समाजासमोर आला पाहिजे व समाजाला प्रेरणा मिळाली पाहिजे या हेतूने या विशेष शोचे आयोजन केल्याची माहिती बाळासाहेब भिसे यांनी दिली.

            क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच महिलांना समाजात आदराचे स्थान आहे विविध क्षेत्रात महिला सक्षमपणे कार्य करीत आहेत, महिलांच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या संघर्ष समाजाच्या हिताचा होता त्यांच्यामुळे महिला व महिलांमुळे समाज शिक्षित झाला जास्तीत जास्त नागरिक व महिलांनी हा चित्रपट पाहावा असे आवाहन ह्यूमन राइट्स व्हाईस प्री्सीडेन्ट भारती तुपे यांनी केले.



             महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित या चित्रपट निर्मितीत अनेक अडथळे आले परंतु त्यांचे कार्य समाजासमोर यावे हा आमच्या सर्वांचा उद्देश होता म्हणून चित्रपट निर्मिती व  प्रदर्शित होण्यासाठी खूप मेहनत घेतली प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला असे प्रतिपादन कलादिग्दर्शक संदीप यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post