नागनाथ ससाणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
लातूर : औसा तालुक्यातील आशिष फाट्याजवळ कारचा अपघात झाला या अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटुरे यांचा मुलगा प्रसाद यांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली आहे. या अपघातात अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले आहेत नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग तुळजापूर लातूर रोडवर वर आशिष पाटी जवळ परभणी जिल्ह्यातून भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता.
सोलापूर हुन लातूरकडे प्रसाद निटुरे हे एम एच २४ ए एस १६०० या क्रमांकाच्या कारणे येत असताना कारने टेम्पोला पाठीमागून जोराची धडक बसल्याने त्यात प्रसाद निटुरे जखमी झाले होते. अशी प्राथमिक माहिती आहे त्यांच्यासोबतचे अन्य दोघेजण किरकोळ जखमी झाले अपघात होतास स्थानिक नागरिकांनी जखमीला शासकीय रुग्णालय लातूर येथे हलवण्यात आले. परंतु यामध्ये प्रसाद निटुरे यांचे रुग्णालयात येई पर्यंत निधन झाले असे डॉक्टरांकडू घोषित करण्यात आले. जखमी झालेल्यावर लातूर येथे शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहे.


Post a Comment