गजानन टिंगरे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे इंदापूर: कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवलिलानगर डाळींब मार्केट इंदापूर या ठिकाणी इंदापूर कृषि महोत्सव २०२४, चे आयोजन करण्यात आलेले आहे.
बुधवार दि.२४ जानेवारी ते रविवार २८ जानेवारी या कालावधीमध्ये पाच दिवशीय कृषि प्रदर्शन, पशु पक्षी, जनावरे, मत्स्य प्रदर्शन व डाॅग शो तसेच पुणे जिल्ह्यातील एकमेव घोडे बाजार भरणार आहे. इंदापूर कृषि प्रदर्शनाचा भुमिपुजन समारंभ बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी दुपारी इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती विलास माने, उप सभापती रोहित मोहळकर, आमदार यशवंत माने, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे यांचे हस्ते संपन्न झाल्याची माहिती इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
इंदापूर कृषि महोत्सव २०२४, अंतर्गत कृषि प्रदर्शनामध्ये शेती उत्पादने, बी- बियाणे, शेती औजारे, साधने, आॅटो मोबाईल्स, गृहपयोगी आवश्यक वस्तु, शेती, कृषि अणुषंगीक यांत्रीक साहित्य कृषि प्रदर्शन २५० स्टाॅल, पशु पक्षी, जनावरे प्रदर्शन, आणि घोडे बाजार, घोडे चाल,(रवाल), नाचकाम स्पर्धा, शिवाय स्मार्ट घोडे नर मादी, नूकरा, मारवाड, काटेवाडी, सिद्धी हे घोडे बाजाराचे प्रमुख आकर्षण राहणार आहे. तर शालेय विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम व पुरूष-मुलांसाठी महाराष्ट्राची लोककला हा कार्यक्रम सादर होणार आहे. मुली व महिलांसाठी खास मोनाली करंदीकर यांचा फुल टु धमाल व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे.लहाण मले व प्रोढांसाठी मनोरंजनाचे खेळ, खव्वयांसाठी खाऊगल्ली, असे सिस्तबद्ध नियोजन करण्यात आलेले आहे.
प्रदर्शनात एक कोटीची आॅफर असलेला व दोन टन वजनाचा गजेंद्र रेडा निविण्यपूर्ण आकर्षण राहणार आहे. तर शेतकर्यांसाठी ड्रोन यंत्र सामुग्री स्टाॅल उपलब्ध होणार असुन कार्यक्रम स्थळी विविध ठीकाणाहुन मोफत बसची सोय करण्यात आलेली आहे. इंदापूर शहरातील तहसिल कार्यालय, नविन प्रशासकीय इमारत या ठिकाणापासुन प्रदर्शन स्थळापर्यंत मोफत बससेवा प्रवासाची सोय करण्यात आलेली आहे. तसेच चालु वर्षी नव्याने अश्वारोहनातील आॅलंपिक क्रिडाप्रकार प्रात्यक्षीके महाराष्ट्र लोककला, बुलेट रायडींग, असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
सदर कृषि प्रदर्शनामध्ये ज्या व्यावसायीकांना आपले नामांकीत कंपनीची शेती, साधने, उत्पादने, शेती अणुषंगीक स्टाॅल उभारावयाचे असतील त्यांनी स्टाॅल नोंदणीसाठी शंकर शिंदे मो.क्र. ९०९६३५५५४१ व ७५६४९०९०९१ या क्रमांकावर संपर्क साधाण्याचे आवाहन करण्यात आले असुन यावेळी बाजार समितीचे सभापती विलास माने, उपसभापती रोहित मोहळकर, माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे, संचालक आमदार यशवंत माने, दत्तात्रय फडतरे, मधुकर भरणे, संग्रामसिंह निंबाळकर, मनोहर ढुके, संदिप पाटील, रूपाली वाबळे, मंगल झगडे, आबा देवकाते, तुषार जाधव, संतोष गायकवाड, अनिल बागल, दशरथ पोळ, रोनक बोरा,सुभाष दिवसे यांचेसह प्रभारी सचिव संतोष देवकर हे उपस्थित होते.

Post a Comment