सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : मांजरी उपबाजारात मज्जाव केल्याने खोतीदारांनी सुरू केलेल्या असहकार आंदोलनात शेतकऱ्यांचा पाठिंबा जोरदार मिळत आहे, रयत शेतकरी संघटनेने खोतीदारांना पाठिंब्याचे पत्र दिले व संचालक मंडळाकडे पाठपुरावा करून निर्णय बदलावा अशी मागणी करणार असल्याचे आश्वासन दिले त्यामुळे खोतीदारांच्या आंदोलनास यश मिळेल अशी आशा निर्माण झाली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी स्वर्गीय अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजार येथे खोतीदारांना मज्जाव केल्याने गेल्या चार दिवसापासून खोतीदारांनी शेतकऱ्यांचा भाजीपाला काढणे बंद केले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे, खोतीदारांच्या आंदोलनात शेतकऱ्यांच्या पाठिंबा वाढत असून हवेली तालुक्यातील शेतकऱ्यांनी पाठिंब्याची पत्र दिले आहे.
खोतीदारांच्या या आंदोलनाची दखल घेत रयत शेतकरी संघटनेने आज खोतीदारांची भेट घेतली व पाठिंब्याचे पत्र दिले तसेच संचालक मंडळाकडे पाठपुरावा करून खोतीदारांना अडीच हजार गड्डीची परवानगी द्यावी व त्यांचे रद्द केलेले परवाने पूर्वर्त करावेत अशी आग्रही भूमिका घेणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी यांनी सांगितले. मांजरी उपबाजारात आम्ही अनेक वर्षापासून व्यवसाय करता असून शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारे फसवणूक केलेली नाही त्यामुळे संचालक मंडळांनी आम्हाला मांजरी उपबाजारात परवानगी द्यावी तसेच परवाने रद्द केलेले पुर्ववत करावेत आणि आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका खोतीदार आंदोलक बाळासाहेब भिसे यांनी मांडली.
यावेळी खोतीदार यावेळी खोतीदार व्यवसायिक बाळासाहेब भिसे, शिवाजी सुर्यवंशी, अशोक मुळीक, भाऊसाहेब धुमाळ, बाळासाहेब लेंडे, गणेश कामठे, दामोदर मोडक, विलास ऊर्फ पप्पु मोडक, बाबा गव्हाणे, सौरभ ताम्हाणे, नितीन डोके, सोमनाथ कोतवाल, नितीन चंद, राजाभाऊ महानवर, प्रशांत आखाडे, वनराज खेडेकर, काका सुर्यवंशी, निजाम शेख, साहेबराव झांबरे, प्रेम आटोळे, राजु डांगमाळी उपस्थित होते.
खोतीदार आंदोलकाच्या आंदोलनास वाढता पाठिंबा लक्षात घेता संचालक मंडळ आपल्या निर्णयाचा फेर विचार करेल अशी आशा निर्माण झाल्याने खोतीदारांना न्याय मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे.

Post a Comment