शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"माझी आई" पत्नी" टेम्पो घेऊन शेतकऱ्यांचा माल काढतो... पण व्यापाऱ्यांना देऊ नका! "संचालकाच्या अजब सल्ल्याने व्यापारी - शेतकऱ्यांमध्ये वाद होण्याचा धोका!


 सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज 

👉🏻 "बाजार व्यवस्था उध्वस्त करण्याचा संचालकांचा डाव..!

पुणे (हवेली) : मांजरी उपबाजारात खोतीदारांना संचालकांनी मज्जाव केलेला असतानाच संचालक शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद लावण्याचा प्रकार करत आहेत, माझी, आई, पत्नी टेम्पो घेऊन शेतकऱ्यांचा माल काढतो व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये प्रवेश करून द्यायचं नाही असा अजब सल्ला शेतकऱ्यांमध्ये पसरवून बाजार व्यवस्था उध्ववस्त करण्याचा डाव संचालक करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


              गेल्या काही दिवसापासून स्व. अण्णासाहेब मगर मांजरी उपबाजारात खोतीदारांना मज्जाव केल्याने हा प्रश्न ऐरणीवर आलेला असतानाच यावर संचालक मंडळात कोणताही निर्णय झाला नाही उलटा संचालक मंडळांचाच वाद उफाळून आल्याची चर्चा मार्केट कमिटी मध्ये आहे, खोतीदारांनी तीन तालुक्यातील शेतकऱ्यांचा माल काढणे बंद केल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत मोठ्या प्रमाणात माल काढण्यापासून पडून राहिल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याचा इशारा देखील दिला आहे, उसाचे हप्ते थकल्याने तीन तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला लावला आहे भाजीपाला काढून घेण्याची व्यवस्था शेतकऱ्यांकडून होत नसल्याने खोतीदार व्यापाऱ्यांना ते रान देतात खोतीदार रानातील माल मजूर लावून काढून घेऊन मार्केटला विकतात व ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांचे पैसे देतात हे अनेक वर्षापासून पारंपरिक पद्धतीने चालू असताना संचालक मंडळांनी मांजरी उपबाजारात खोतीदारांना अचानक मज्जाव केला त्यामुळे खोतीदारांनी देखील माल न काढण्याचे अस्त्र उपसले अन संचालकांची पंचाईत झाली.


             पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक झाली याच विषयावरून व पैशाच्या देवाण-घेवाणीवरून संचालक मंडळात वाद झाल्याची चर्चा मोठ्या प्रमाणात चर्चिली जात आहे. त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात एका संचालकांनी शेतकऱ्यांना गोळा करून सभेचे स्वरूप दिले व व्यापाऱ्यांना या मार्केटमध्ये येऊ द्यायचे नाही हे शेतकऱ्यांसाठी मार्केट आहे असे सांगून शेतकरी व व्यापारी यांच्यात वाद लावण्याचा प्रयत्न सुरू केल्याची चर्चा बाजार समितीमध्ये रंगली आहे.


               पुणे जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती ही जिल्ह्यातील आदर्श समिती असून या समितीच्या माध्यमातून हजारो शेतकरी, व्यापारी व मजूर, हमाल यांची गुजराण होते वीस वर्ष प्रशासक असताना प्रशासकाच्या काळात मार्केट कमिटीचा कारभार योग्य रीतीने चालला होता मात्र संचालक मंडळाची निवडणूक झाली आणि नव्याने निवडून आलेल्या संचालक मंडळांनी रोज एक नवीन फतवा काढण्यास सुरुवात केली त्यामुळे खोतीदारांनी शेतकऱ्यांचा माल बंद केला  हवेली, दौंड व  पुरंदर तालुक्यातील लाखो रुपयांचा माल काढण्यावाचून पडून असल्याने शेतकऱ्यांच्या पोटात गोळा आला आहे. आमचा माल काढून नेण्यास खोतीदार व्यापाऱ्यांना परवानगी द्या किंवा संचालक मंडळांने पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही असे अनेक व्हिडिओ शेतकऱ्यांचे व्हायरल होत आहेत.


                "संचालकाचा अजब कारभार उघडकीस - शेतकरी हैराण....!
            खोतीदारांनी शेतकऱ्यांचा माल काढला नाही तर मी माझी पत्नी, आई व टेम्पो घेऊन येतो व शेतकऱ्यांचा माल काढून मार्केटला नेऊन विकतो असा अजब सल्ला एक संचालक देत असल्याने तीन तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात हा चर्चेचा विषय बनला आहे खोतीदारांवर संचालकांचा एवढा राग का असा सवाल या निमित्ताने निर्माण झाला आहे खोटे खोतीदारांना मज्जाव करण्यामागं संचालक एकमेकांवर कुरघोडी करण्याचा तर प्रयत्न करत नाही ना? अशी चर्चा पसरली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post