सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : लोणी काळभोर येथील दि.१०/०१/२०२४ रोजी हिट अँड रन कायद्यातील शिक्षेमध्ये करण्यात आलेल्या बदलाच्या निषेधार्थ टँकर व ट्रक चालक यांनी संप पुकारण्यात आला होता.
त्यामुळे लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील एचपीसीएल आयओसीएल बीपीसीएल या ऑइल डेपो मधून सकाळच्या सत्रामध्ये पेट्रोल व डिझेलची वाहतूक पूर्णपणे बंद होती. त्या अनुषंगाने सकाळी ११:०० वाजता ट्रान्सपोर्टर, डीलर, चालक व कंपनी प्रबंधक मॅनेजर यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकी दरम्यान जे माल वाहतूकदार चालक हे पेट्रोल डिझेलची वाहतूक करण्यास इच्छुक आहेत. त्यांना योग्य तो पोलीस बंदोबस्त देण्यात येईल तसेच नवीन कायद्यासंदर्भात असलेल्या तरतुदी बाबत उपस्थिताना मार्गदर्शन करून पेट्रोल डिझेल टँकरची वाहतूक सुरू करण्याबाबत सांगितले. असता सुरवातीला त्यातील काही ट्रान्सपोर्टर व डीलर यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद देऊन पेट्रोल व डिझेलची टॅंकर वाहतूक सुरू करण्यात सहमती दर्शवली.
त्यानुसार दिवसभरात बीपीसीएल, एचपीसील, बीपीसीएल या डेपो मधून पेट्रोल डिझेल ची वाहतूक करणारे टँकर पोलीस बंदोबस्तामध्ये हडपसर पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेशन, तसेच यवत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुढील प्रवासासाठी सुरक्षितपणे पोहचविण्यात आले आहे. दररोज होणाऱ्या टँकर वाहतुकी पैकी आज संप कालावधीमध्ये २१.०० वाजेपर्यंत ५५ ते ६० टक्के इतक्या पेट्रोल डिझेल टँकरची सुरळीतपणे वाहतूक करण्यात आली.
तसेच हद्दी मधील तीनही ऑइल डेपोच्या ठिकाणी रात्रपाळीला पोलीस स्टेशन कडील योग्य तो बंदोबस्त लोणी काळभोर पोलीसांनी ठेवला. या संपूर्ण प्रकरणावर लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण व इतर पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत.


Post a Comment