शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

मुळा मुठा नदीवरील अर्धवट पूल. मच्छरांची पैदास ; नागरिकांचे आरोग्य धोक्यात, नदीपात्रात धरणे आंदोलन...


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : मांजरी बुद्रुक व मांजरी खुर्द येथील मुळा मुठा नदीवरील पूल बांधण्याचे काम गेले कित्येक वर्ष धीम्या या गतीने चालू आहे.

                नदीपात्रामध्ये ठेकेदाराने बंधारा घालून पाणी अडवले आहे. पर्यायाने पुण्यातून आलेली पाणी व जलपर्णी येथील संपूर्ण नदीपात्रामध्ये भरगच्च भरलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती झालेली आहे.

            मांजरी बुद्रुक मधील मांजरा नगर झोपडपट्टी, गावठाण तसेच मांजरी खुर्द मधील नदीकिनारी असणाऱ्या हजारो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. डेंगू, मलेरिया सारखे आजार येथील नागरिकांना झालेले आहेत. या सर्व गोष्टीस सार्वजनिक बांधकाम खात्याकडील संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत. गेली तीन ते चार वर्षे झाली या पुलाचे काम रखडलेले आहे.

             सध्या पुलाचे ९० टक्के काम पूर्ण झालेले आहे. परंतु ठेकेदाराने पाणी अडवण्यासाठी घातलेला बंधारा अद्यापही काढलेला नाही. पर्यायाने नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना मच्छरांचा खूपच त्रास होत आहे. या अगोदर तक्रारी करूनही पुणे मनपाचे याकडे पूर्णपणे वारंवार दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन पुणे मनपाने सार्वजनिक बांधकाम खात्याकडून संबंधित ठेकेदारावर हजारो लोकांचे आरोग्य धोक्यात आणले. या गुन्ह्याखाली गुन्हा नोंद करून नदीवरील संबंधित ठिकाणचा बंधारा त्वरित काढून टाकावा. तसेच संपूर्ण जलपर्णी काढण्यात यावी. तसेच नदीकिनारी असणाऱ्या मांजराईनगर झोपडपट्टीमध्ये औषध फवारणी करण्यात यावी. असे आम आदमी पार्टी प्रभाग क्रमांक २२ चे राजेंद्र साळवे यांनी सांगितले



              अन्यथा १५/०१/२०२४ सोमवारी दुपारी चार वाजता मांजरी बुद्रुक मधील मुळा मुठा नदीपात्रामध्ये अंदाजे १०० पुरुष व १०० महिला यांच्या समवेत बेमुदत धरणे आंदोलन करणार आहे.. तरी संबंधित अधिकारी यांनी यांची त्वरित दखल घ्यावी असे खालील प्रमाणे निवेदन देण्यात आले आहे. आरोग्य प्रमुख पुणे मनपा, मल :निसारण प्रमुख, पुणे मनपा, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, सहाय्यक आयुक्त हडपसर क्षेत्रीय कार्यालय, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकंद पोलीस स्टेशन, उपायुक्त (विशेष शाखा) पुणे शहर पोलीस या ठिकाणी माहिती साठी निवेदनाद्वारे पाठवण्यात आली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post