शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने हडपसर मध्ये निषेध आंदोलन ; जिल्हाप्रमुख विजय देशमुख


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हडपसर) : आमदार अपात्रते संदर्भातील विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख विजय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हडपसर मध्ये निषेध आंदोलन करण्यात आले. 

             यावेळी राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने नेमून दिलेल्या चौकटीच्या विरोधात विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिल्याने हडपसर विधानसभा मतदारसंघांमध्ये निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळलेली होती. येणाऱ्या निवडणुकीत जनताच खऱ्या अर्थाने यांना धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही असे मत शिवसेना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

              याप्रसंगी जिल्हाप्रमुख विजय देशमुख, उपशहर प्रमुख समीर तुपे, शहर संघटिका विद्या होडे, शहर संघटक सुरज मोराळे, विभाग प्रमुख दत्ता खवळे , दिलीप व्यवहारे, संघटक संजय सपकाळ, उपविभाग प्रमुख महेंद्र बनकर, दिनेश निकम, जितू कदम, मुकुंद लाकडे, शाखाप्रमुख अजय संकपाळ, सतीश गोते, शहेबाज पंजाबी, योगेश जैन, अमर देशमुख, बाबू काळे, गणेश कळसाईत, मुन्ना माने, राजेंद्र चौधरी, भगवंत कडू,भरत कदम, यश गायकवाड, गणेश जाधव, अनिकेत सपकाळ, युवा सेना समन्वयक प्रवीण हिलगे, उपविभाग अधिकारी राहुल खलसे, वीरभद्र गाभणे, प्रवीण रणदिवे, सतीश भिसे आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post