सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
अकोला : नवनियुक्त पोलीस अधीक्षकांनी अकोल्याचा पदभार सांभाळला आणि गुन्हेगारांना सळो की पळो करण्याचे आदेश आपल्या पोलीस विभागाला दिले... त्याच प्रमाणे गैरकृत्य होत असलेल्या केफे सेंटरवर ही कारवाईचे आदेश दिले.. या आदेशानंतर पोलीस यंत्रणा लागलीच कामाला लागले..
यातूनच सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवाहर नगर येथील एका चहा बार वर पोलिसांनी चक्क नासधूस केली...
कोणतंही करण न सांगता पोलिसांनी या केफेवर येऊन ग्राहकांना शिवीगाळ करत तेथून हाकलून लावले. हा आरोप दुकान मालकाने केलाय..
तर बाकी येथे काय घडलं हे सांगाण्याची गरज नाही ते आपण या सिसिटीव्ही फुटेज मध्ये पाहू शकता..
पोलिसांनी येथे ग्रामीण भागातून काम करण्यासाठी येत असलेल्या युवकाला चक्क स्टूल फेकून मारला यामध्ये तो किरकोळ जखमी सुद्धा झालाय.. कारवाईच्या नावावर पोलीस देहशत निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी दुकान मालकाने केलाय.
या धडक कारवाई नंतर पोलिसांच्या कारवाईवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.

Post a Comment