शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या ऐवजी, पुणे जिल्हाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांची नियुक्ती...


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे - पुणे जिल्ह्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून पंकज देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अंकीत गोयल यांची पदोन्नतीने गडचिरोली परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


           अतिरिक्त पोलिस अधीक्षक मितेश घट्टे व आनंद भोईटे या दोघांचीही पोलिस उपायुक्त बृह्नमुंबई येथे बदली करण्यात आली आहे. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या बदल्यांचे आदेश पारित केले आहेत.


           गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक असलेले पंकज देशमुख आता पुणे जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. नागरी संरक्षण व गृहरक्षक दलाचे अतिरिकत् नियंत्रक संजय जाधव बारामती विभागाचे नवीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारणार आहेत. चाळीसगावचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभागाचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून कार्यभार स्विकारतील.


            लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधिका-यांच्या बदल्या होणार होत्या. आज शासनाने अध्यादेश जारी करत या बदल्यांवर शिक्कामोर्तब केले

Post a Comment

Previous Post Next Post