शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अण्णासाहेब मगर महाविद्यालयात आर्थिक साक्षरता कार्यशाळेत मार्गदर्शन करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विभाग तसेच महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या "करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी आर्थिक साक्षरता कार्यशाळा आयोजित करण्यात आले 

               या कार्यशाळेत उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल महाविद्यालयातील प्राध्यापकांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. 

            या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. नितीन घोरपडे, करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. अनिल जगताप, करिअर कट्टा समन्वयक प्रा. नितीन लगड उपस्थित होते.

              या कार्यशाळेत ऑनलाइन बँकिंग, युपीआय प्रणालीचा वापर, पॅन कार्ड, बैंक अकाउंट, बँकिंग व्यवहार व डिमॅट अकाउंट, शेअर मार्केट इत्यादीची आर्थिक व्यवहारांसंबंधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले होते.



             महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागातील डॉ. शुभांगी औटी, डॉ. गंगाधर सातव, डॉ. अशोक ससाणे, प्रा. नीता कांबळे, प्रा. प्रतिक कामठे, प्रा. नेहा साळुंखे, प्रा. अजिनाथ डोके, प्रा. विवेकानंद टाकळीकर, प्रा. अक्षय उगीले, प्रा. विशाल झेंडे, प्रा. गौरव शेलार, प्रा. प्रवीण पोतदार, प्रा. अश्विनी घोगरे, प्रा. समीर नाचन, प्रा. माहेश्वरी जाधव, प्रा. आरती पवार या प्राध्यापकांना महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

            प्रा. नितीन लगड यांनी सूत्रसंचालन केले तर आभार उपप्राचार्य डॉ. शुभांगी औटी यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post