सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हडपसर) : अण्णासाहेब मगर महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असणाऱ्या "करिअर कट्टा" सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त "डिजिटल प्रॉडक्टिव्हिटी" या कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. करिअर कट्टा" या उपक्रमांतर्गत डिजिटल प्रॉडक्टिव्हिटीचे ऑनलाईन प्रशिक्षण मोफत दिले गेले. हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या प्रत्येकाला ऑनलाईन सर्टिफिकेट मिळाले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी हा कोर्स यशस्वीपणे पूर्ण केला. या कोर्ससाठी प्राचार्य, १८०९ विद्यार्थी, १७१ प्राध्यापक आणि ४२ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे २०२३ प्रशिक्षणार्थींनी सहभाग घेऊन प्रमाणपत्र संपादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून प्रातिनिधिक स्वरूपात काही सर्टिफिकेट्सचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
एवढ्या मोठ्यासंख्येने सहभाग नोंदवून कोर्स यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राध्यक्ष यशवंत शितोळे यांनी महाविद्यालयाचे कौतुक केले.
या संदर्भात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे म्हणाले, माहिती व तंत्रज्ञान लोकांच्या अंगवळणी पडले आहे. त्याचा आपण वापर करत आहोत. फक्त तांत्रिक बाजू समजून घेऊन दैनंदिन कामकाजात सकारात्मकरितेने उपयोजन केले पाहिजे.
यावेळी उपप्राचार्य डॉ. प्रशांत मुळे, डॉ. शुभांगी औटी, करिअर कट्टाचे जिल्हा समन्वयक प्रा. अनिल जगताप, करिअर कट्टा समन्वयक प्रा. नितीन लगड, प्रा. नीता कांबळे यांनी हा कोर्स यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.


Post a Comment