नागनाथ ससाणे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
लातूर (उदगीर) : उदगीर तालुक्यातील किनी यल्लादेवी येथे तहसीलमार्फत मतदारासाठी २०२४ लोकसभा व जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या काळामध्ये मतदाराने मतदान कसे करावे यासाठी तहसील कार्यालयाकडून जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे.
EVM वाहनामार्फत गावोगावी जनजागृती करण्यात येत आहे गावामध्ये वाहन आली असता किनीयल्लादेवी येथील ग्रामस्थांकडून विरोध दर्शविण्यात आला EVM मिशन बंद करून बॉयलेट पेपरवर येणारे निवडणूक घेण्यात यावे म्हणत विरोध करण्यात आला. यावेळी किनीयल्लादेवी येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहून वाहानला विरोध करण्यात आला. या वेळी ग्रामस्थांकडून व ग्रामपंचायत कार्यालयाकडून तहसील कर्मचाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment