शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

९ वर्षीय प्रांजलीने जिंकली उपस्थितांची मने !


 गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यामध्ये - रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, त्यातून धावणारी खिल्लारी बैलाची जोडी, आणि गाडीत बसलेले आम्ही, निखळ आनंद लुटण्याचा. निसर्गाला जवळून पाहण्याचा अनुभव, आमच्या पिढीतील सर्वांनी घेतलाय आहे. 


            आमच्या पोरांना मात्र भविष्यात निर्भेड, निरपेक्ष मोफत आनंद यापुढे भेटणार नाही. हिरवे शेते टिकून टिकून ठेवायचे असेल तर वृक्षतोड थांबली पाहिजे असे मत शिवश्री प्रांजली जाधव हिने व्यक्त केले. 

    

    ‌    दि १३ फेब्रुवारी रोजी सवडद गणेश जयंती महोत्सवात व्याख्यानात ती बोलत होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच अण्णासाहेब देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील, तेजराव देशमुख, सरपंच गजानन श्रीधर देशमुख, रावसाहेब देशपांडे, अनिल जगताप, संजय गाडगे हे होते.  प्रारंभी आपल्या प्रास्ताविकात व्हाईस ऑफ मिडिया साप्ताहिक विंगचे जिल्हाध्यक्ष संतोष गाडेकर यांनी सवडदच्या शाळेच्या पाठिमागे या परिसराचा शौचालयासाठी वापर व्हायचा दाटगर्द झाडाझुडपात उकिरडे अन यातच दारूडे दारू पुरून ठेवायचे. कालांतराने येथे वटवृक्ष असल्याने येथे एक चौथरा उभारण्यात आला. दरम्यान गांवात गणेशोत्सवाची प्रचंड अहमहमिका असल्याने येथेही छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने गणेश स्थापना केली जायची. पाच वर्षे या ठिकाणी गणेश स्थापना होत असल्याने शेवटच्या दिवशी मिरवणूकी दरम्यान वादाची ठिणगी पडायची त्यामुळे थेट मंदिर उभारण्यात येऊन बारा वर्षापासून दरवर्षी गणेश जयंतीला समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले. 


           यावेळी तेजराव देशमुख यांनी आपले विचार व्यक्त केले. आपल्या खुमासदार शैलीत प्रांजली पुढे म्हणाली की, गाडवाटांनी जाताना. अवखळ ओढे नदया,पराड पायथ्याशी घर करुन बसलेली घरे, त्यांच नितळशार पाणी, दुपारच्या उन्हात आश्रयाला आलेला गुरेवासरांचा वावर, त्या भल्यामोठया आंब्याच्या झाडाखाली, वड पिंपळाच्या झाडाखाली निवांत बसायचा, रनरनत्या उन्हात,,,त्याची सावली जिवाला भावून जायची, अशा वेळी गाडीतून प्रवास करणारी. स्त्यावरुन ऐकटे जाणारी,, बाजारहाट संबंधी कचेरी नाना विधचा पगडा, डोक्यात घेवून तसेच वावरात काम करुन मिळालेली मायमाउली, या झाडांच्या सावलीत निवांत विसावा घ्यायची, आम्ही लहान पोर या झऱ्यातून वाहणारे नित्तळ पाण्याच आनंद घ्यायचो... त्यात गाई, म्हशीच्या खुरांनी फसलेल्या पाउलखुणांतील निर्मळ पाणी, घटघटा प्यायचो, दणक्यात फोडलेला कांदा, चटणी, कच्छी कौरी, भाकरी बरोबर गटागटा खावून वडाच्या पारंब्या, आंब्याच्या ढाहळया बरोबर मस्ती करायची, सावलीत छान मैफील जमायची, मजा यायची,,,, मात्र,,, ते,,,, आमच्या चिमुकल्यांच्या नशीवात आज नाहीये. आजच्या धावपळीच्या तांत्रीक युगात हे सुख नाही, आम्हाला तर निश्चितच नाहिये, आजच्या पोरांनाही नाहिये, त्यांच्या साठी केवळ स्वप्नरंजक ठराव, नैसर्गिक सौंदर्याच्या बाबतीत आनंद,,, या पिढीसाठी दुरापास्तच झालाय,, या निसर्गाच्या भरवश्यावर,, आम्ही जगत आलोय, त्याच्याशी, आम्ही आज कृतघ्न झालोय,, ही मोठी शोकांतिका आहे, मानवच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंत साथ देणारा निसर्ग,,,, झाड, वेली, पान, फुल, यांच्या असेलेले आमचे नातं तुटत चालल्याचे ती म्हणाली. 

             

              कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रख्यात कवी तथा निवेदक अजीम नवाज राही तर आभार प्रदर्शन संतोष गाडेकर यांनी केले. यावेळी पन्नास वर्षे ग्रामपंचायत मध्ये निष्ठेने सेवा करणारे जानराव आबा यांचा पेरे पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post