शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

चौकट प्रतिक्रिया साखरखेर्डा पोलीस स्टेशन अंतर्गत शेतकरी बांधवांनी व्यापारी बांधवांनी आर्थिक व्यवहार झाल्यानंतर रोख रक्कम आपल्याजवळ काळजीपूर्वक ठेवावी तिचे संरक्षण करावे आजूबाजूला कोणीही संशयित व्यक्ती दिसल्यास गाडी दिसल्यास त्याचा फोटो काढून पोलीस स्टेशनला कळवावे पोलीस नक्कीच आरोपी पकडण्यास मदत करतील स्वप्निल नाईक - ठाणेदार साखरखेर्डा


 गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


बुलढाणा (साखरखेर्डा) : साखरखेर्डा पोलीस स्टेशन मधील चार्ज घेतल्यानंतर कर्तव्यदक्ष ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी अनेक पारदर्शक कामे केली आहे. सर्वांना सोबत घेऊन गावे तंटामुक्ती कशी होतील याची दखल घेत आहे. त्याचबरोबर व्यापारी व शेतकरी बांधवांचे हित सुद्धा ते जोपासत आहे. 


साखरखेर्डा पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व व्यापारी व शेतकरी बांधवांनी धान्य विक्री केल्यानंतर किंवा कोणताही आर्थिक व्यवहार केल्यानंतर आपण सोबत जी रोख रक्कम कॅश रक्कम बाळगतो तिचे रक्षण करणे आपले कर्तव्य आहे. त्या रकमेची काळजी घेणे आपले काम आहे. आर्थिक व्यवहार झाल्यानंतर आजूबाजूला आपल्या कोणी आहे की नाही कोणी संशयीत रित्या आपल्याला बघत तर नाही ना याची काळजी घेणे गरजेचे आहे, सतर्क राहून आर्थिक व्यवहार करणे सुद्धा आता गरजेचे झाले असून, नुकतीच दोन जबरी चोरीचे गुन्हे घडलेले आहे, मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी येथे चोरट्याने एका शेतकऱ्याच्या कारमधून काचा फोडून दहा लाख रुपये लंपास केले अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या धोत्रा नंदाई फाट्याजवळ सुद्धा राजुरी स्टील कंपनीच्या मालकाने वसूल केलेले २७ लाख रुपयांची रक्कम चोरट्यांनी गाडी अडवून रोख रक्कम घेऊन पोबारा केला. 


          त्यामुळे शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांनी काळजी घेणे गरजेचे झाले आहे कोणीही संशयितपणे आढळल्यास त्वरित पोलिसांना त्याचा फोटो काढून वाहनाचा फोटो काढून पाठवावे असे आवाहन साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी व्यापारी बांधवांना व शेतकऱ्यांना केली आहे .

Post a Comment

Previous Post Next Post