शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यात प्रसादाच्या भगरीतून जवळपास ३०० ग्रामस्थांना विषबाधा!; खापरखेडा सोमठाणा



 गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील खापरखेडा सोमठाणा येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजित कार्यक्रमात देण्यात आलेल्या भगरीतून विषबाधा झाल्याने जवळपास २५० ते ३०० ग्रामस्थ अत्यवस्थ झाले होते.



           त्यांना सप्ताहाच्या जागेवरून रोडवर आणण्यासाठी सोमठाणा खापरखेडा येथील युवकांनी शर्तीचे प्रयत्न केले. त्यानंतर दिलीप राठोड यांनी प्रायव्हेट गाड्या पिकअप ४०७ व १०८ कॉल सेंटरला फोन करून परिसरातील सर्व गाड्या व ॲम्बुलन्सला पाचारण केले त्यानंतर सोमठाणा खापरखेडा गावचे  सरपंच पुत्र राहुल शिंदे, ग्रामसेवक भाग्यवंत  तहसीलदार गिरीश जोशी  ठाणेदार सोनकांबळे यांना माहिती देऊन पुढील उपचारासाठी बीबी, मेहकर, सुलतानपूर, लोणार, अंजनी अशा खाजगी व शासकीय रुग्णालयात ग्रामस्थांच्या सोयीनुसार त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले.

   


           परंतु काही शासकीय रुग्णालयात डॉक्टर हजर नसल्याकारणाने बीबी डॉक्टर असोसिएशन चे सर्व डॉक्टर्स नर्स व मेडिकल स्टोअर्स आणि बीबी येथील युवकांनी उपचारासाठी शर्यतीचे प्रयत्न केले. ग्रामीण रुग्णालय बीबी येथे उपचारासाठी बेड अपुरे पडत असल्याने दवाखान्याच्या बाहेरील ग्राउंड वर विषबाधा झालेल्या ग्रामस्थांना उपचार घेण्यासाठी बीबी येथील ग्रामस्थांनी प्रयत्न केले. त्यानंतर सर्व परिसरातील नेतेमंडळी आपापल्या परीने सहकार्याची भूमिका बजावत होते शासकीय यंत्रणेतील लोणार तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार गिरीश जोशी , नायब तहसीलदार डोळे, मंडळ अधिकारी सानप , सौदर तलाठी राणे  दादाराव साळवे, पंचायत समिती चे रविभाऊ मापारी तालुका आरोग्य अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटिल एसडीओ, ठाणेदार सोनकांबळे  लोणारचे ठाणेदार निमिश मेहेत्रे  लोंढे इतर शासकीय व राजकीय मंडळी हजर होते.

Post a Comment

Previous Post Next Post