शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

एकच नारा “E.VM. हटाओ एकच नारा “E.VM. हटाओअपना भारत देश बचाओ” : तरुण बसला पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला...

ष्

 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे : इ. व्ही. एम मशीन ( इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन / मतदान यंत्र ) च्या संदर्भात भारतीय नागरिकांच्या मनामध्ये संभ्रह्म निर्माण झाला असून, या कारणास्तव लोकांनी लोकांसाठी बनवलेली "लोकशाही" धोक्यात येण्याची शक्यता असल्या कारणाने इ. व्ही. एम मशीन ( इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन / मतदान यंत्र )  या मागणीसाठी ऐन निवडणूका तोंडासमोर असताना पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे.


            हनुमंत राजकुमार सुरवसे यांनी हे इ. व्ही. एम मशीन ( इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन / मतदान यंत्र ) च्या संदर्भात दि. १९ फेब्रुवारी २०२४ पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरु केले आहे, त्यांचा या उपोषणाचा तिसरा दिवस असून अद्याप कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची दखल घेतली नसून त्यामुळे त्यांची तब्येत खालवत चालली असल्याचे दिसत आहे.


          या आमरण उपोषणास पुण्यातील विविध संघटनांनी तसेच सर्व सामान्य नागरिकांचा ही पाठिंबा असल्याचे चित्र दिसत आहे. जर या उपोषणाची जिल्हाधिकारी यांनी दखल न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर जन आक्रोश मोर्चा काढणार असल्याचे ही या वेळी सांगण्यात आले. या वेळी पंचायत समिती हवेलीचे उपसभापती सनी काळभोर, वंचित बहुजन आघाडी चे हवेली तालुका महासचिव संजय भालेराव, संभाजी ब्रिगेड हवेली तालुका निरीक्षक दिगंबर जोगदंड, मराठा आरक्षण उपोषण कर्ते सूर्यकांत काळभोर, यांनी या आमरण उपोषणास पाठिंबा दिला असून अधिकाऱ्यांनी या उपोषणाची लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा उपोषणाची पुढील दिशा ठरवण्यात येईल, व आंदोलन हे तीव्र स्वरूपात करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post