शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

 माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी यांचे निधन; वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास...


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. दोन दिवसांपूर्वी जोशी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हिंदुजा रुग्णालयात जोशी यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने राजकीय वर्तुळावर शोककळा पसरली आहे.


शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासातील नेता, अशी मनोहर जोशी यांची ओळख होती. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर निवडून येत त्यांनी राजकीय कारकीर्द सुरु केली. शिवसेनेकडून जोशी यांनी मुंबईचे महापौरपदही भूषविले होते. १९९५ मध्ये शिवसेना भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली होती. मनोहर जोशी हे शिवसेनेच्या पहिल्या फळीतले नेते होते. विधानपरिषदेचे आमदार, मुंबईचे महापौर, विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे पहिले वहिले मुख्यमंत्री म्हणून अनेक पदे मनोहर जोशी भूषवली होती.

Post a Comment

Previous Post Next Post