शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

वाहतूक विभागाकडून बुलेटचे सायलेंनसर काढत ८५ बुलेटवर धडक कारवाई : पोलीस निरीक्षक कुमार घाडगे

 वाहतूक विभागाकडून बुलेटचे सायलेंनसर काढत ८५ बुलेटवर धडक कारवाई : पोलीस निरीक्षक कुमार घाडगे


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज

 पुणे (हवेली) : पुणे शहरात बुलेटच्या कारवाई होत असताना लोणी काळभोर वाहतूक विभाग मागे कसा राहील. कर्कश आवाज काढत फिरणाऱ्या बुलेटच्या सायलेन्सरवर धडक कारवाई करण्यासाठी लोणी काळभोर वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांनी आदेश कडताच कारवाईस सुरुवात झाली. 


            अशाच प्रकारे मागील २२ दिवसांच्या कालावधीत वाहतूक शाखेच्या कर्मचारी यांनी विशेष मोहीम राबवून ८५ बुलेटवर कारवाई केली, अशी माहिती महाराष्ट्र पोलीस न्युजला वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी माहिती दिली.


            कंपनीने दिलेल्या सायलेन्सरच्या रचनेत बदल करून दुसऱ्या सायलेन्सर बदलून कानठळ्या बसवणारा, आवाज काढणाऱ्या लोणी परिसरातील वाहन चालकांकडून १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. लोणी काळभोर ठाण्याच्या हद्दीतील टवाळखोर 'बुलेटला सायलेन्सरच्या उनाडखोरीला लगाम घातला. 


               लोणी काळभोर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी फटाका वाजवणाऱ्या बुलेटस्वारांविरोधात केवळ दंड वसूलीची कारवाईच केली नाही तर फटाका वाजवणारे सायलेन्सरही काढून घेत मुळ सायलेन्सर बसवले. यामुळे यापुढे अशा बुलेटवर अंकुश ठेवला जाईल. व अशा कर्कश आवाज काढणार्या बुलेटवर नक्कीच चाप बसेल, अशी आशा लोणी काळभोर व कदमवाकवस्ती येथील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.


कुमार घाडगे, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, लोणी काळभोर, 


आवाज करणाऱ्या बुलेटची पोलिसांना माहिती द्या


         "लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या परिसरातील सर्व वाहनचालकांना ज्यांचे वाहनात फटाके फोडणारे सायलेन्सर किंवा कर्णकर्कश आवाज करणारे हॉर्न लावण्यात आले आहेत. त्यांनी तात्काळ सायलेन्सर काढून घेण्यात यावेत. अन्यथा कारवाई करण्यात  कसुर केली जाणार नाही. कर्णकर्कश आवाज करणाऱ्या बुलेटचा नंबर पोलिसांना द्या, तुमचे नाव गुपित ठेवले जाईल व त्या बुलेटचालकावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येईल.” असे पोलीस निरीक्षक कुमार घाडगे यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post