शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

"बाळासाहेब भिसे यांचे आमरण उपोषण मागे, शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन स्थगित...मांजरी उप बाजारात खोतीदार व्यापाऱ्यांना संचालक मंडळाकडून परवानगी...


 सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे हवेली : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात खोतीदारांच्या अटी शर्ती मान्य करत खोतीदार व्यापाऱ्यांना प्रवेश देण्याचे संचालक मंडळाने मान्य केले. खोतीदारांच्या मागण्या मान्य झाल्याने बाळासाहेब भिसे यांनी ऊसाचा रस घेऊन आमरण उपोषण मागे घेतले.



           रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन स्थगित केले व विजयी जल्लोष करण्यात आला.


              मांजरी उपबाजारात ठेकेदार व्यापाऱ्यांना मज्जाव केल्याने गेल्या आठ दिवसापासून बाळासाहेब भिसे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. तर रयत शेतकरी संघटनेने आत्मदहन आंदोलन आयोजित केले होते संचालक मंडळांनी निर्णय घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती सचिव राजाराम धोंडकर यांनी केली. खोतीदार व्यापाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले तसेच उपोषण आंदोलन मागे घेण्यात आले.


          यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव राजाराम धोंडकर, विभाग प्रमुख किरण घुले, रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष ऍड. रवीप्रकाश देशमुख, सरचिटणीस अंकुश हंबीर, उपाध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष हेमंत चौधरी, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अजय सावंत, पश्चिम महाराष्ट्राचे कायदे सल्लागार बबनराव गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष संतोष महाडिक, सरचिटणीस तानाजी महाडिक, पुणे जिल्हा अध्यक्ष कल्पना गव्हाणे, कार्याध्यक्ष अश्विनी कुंजीर, सरचिटणीस माधुरी वडघुले, हवेली संपर्कप्रमुख प्रियांका आतकिरे, हर्षवर्धन देशमुख, माजी नगरसेवक मारुती आबा तुपे काँग्रेसचे ओबीसी शहराध्यक्ष प्रशांत सुरसे जीवन जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर अध्यक्ष डॉ. शंतनू जगदाळे, माजी सरपंच सचिन तुपे, उपसरपंच गोकुळ ताम्हाणे, पुरुषोत्तम कुंजीर यांच्यासह सर्व खोतीदार शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



          गेल्या आठ दिवसापासून भिसे यांचे उपोषण आंदोलन सुरू होते संचालक मंडळाने काही अटी टाकून खोतीदारांना परवानगी दिली होती. मात्र अटी जाचक असल्याने खोतीदारांनी त्यास विरोध केला, चर्चेतून खोतीदारांच्या अटी मान्य केल्या व त्यांना मांजरी उप बाजारात परवानगी दिली याचे पत्र सचिव राजाराम धोंडकर यांनी दिल्यानंतर  त्यांच्याच हस्ते ज्यूस पिऊन  बाळासाहेब भिसे यांनी उपोषण आंदोलन मागे घेतले.


          यावेळी बाळासाहेब भिसे यांनी सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, शेतकरी संघटना व पाठिंबा दिलेल्या सामाजिक संस्थांचे आभार मानले. 




                  हडपसर व मांजरी बुद्रुक पोलीसांचा चौख बंदोबस्त....

          एकीकडे बाजार समितीचे सचिव आंदोलकांशी वाटाघाटी करत असताना संचालक सुदर्शन चौधरी इतर शेतकरी व्यापाऱ्यांना घेऊन मार्केटमध्ये घोषणा देऊन वातावरण दूषित करत होते, यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच आंदोलनकर्त्यांना थांबवून पुढील होणारा संघर्ष टाळला या ठिकाणी हडपसर व मांजरी बुद्रुक येथील पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला. 

            अग्निशमन दलाची उपस्थिती..

        हडपसर विभागातील अग्निशमन दलातील स्टेशन ड्युटी आॅफिसर प्रमोद सोनवणे, दाभाडे व त्यांचे सहकारी यावेळी फायर ब्रिगेडच्या वाहनासह उपस्थित होते.


             कुंजीरवाडी माजी सरपंच सचिन तुपे..


        खोतीदारांना प्रवेश देताना त्यांना मार्केटमध्ये सुविधा व संरक्षण देण्याचे काम केले जाईल असे सचिव धोंडकर यांनी सांगितले.


           या आंदोलनास मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा...


            गेल्या आठ दिवस आमरण उपोषण सुरू केलेल्या बाळासाहेब भिसे यांना मनोज जरांगे पाटील यांनी देखील दूरध्वनीवरून पाठिंबा दिला, तसेच विविध राजकीय पक्षाचे नेते आजी-माजी आमदार, पदाधिकारी व सामाजिक संस्थांनी भेटून पाठिंबा दिला होता, आंदोलनाची व्याप्ती लक्षात घेता संचालक मंडळाने निर्णय घेऊन खोतीदारांना परवानगी दिली, त्यामुळे अहिंसेच्या मार्गाने भिसे यांनी केलेल्या आंदोलनात यश संपादन करत खोतीदारांचा बाजार समितीत प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले.


Post a Comment

Previous Post Next Post