सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
👉🏻चौकीत साक्षीदारांना जीवे मारण्याची धमकी देवुन घातला गोंधळ गुन्हा दाखल..
पुणे (हवेली) : हडपसर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मांजरी बुद्रुक पोलीस चौकीत गुन्हयातील आरोपी गौरव शर्मा अटक करताना सीमा काकडे यांनी आरोपीला अटक करु नये. नाहीतर तुम्हाला बघुन घेते अशी धमकी दिल्याने पोलीसांनी सीमा काकडे विरुदध सरकारी कामात अडथळा आणला असता त्यांचे विरुदध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांनी हा गुन्हा दाखल केला.
१८४ /२०२४ भादंवि कलम ३५४,३२४, ३२३,५०४, ३४, प्रमाणे
मिना शेखर चांदणे वय-४२ वर्ष, धंदा- घरकाम राहणार- कमलाई सोसायटी, रुम नंबर-२०३, नंदनी टकले नगर, मांजरी बुद्रुक, पुणे. ता. हवेली, जिल्हा पुणे. गौरव हरपाल शर्मा वय ३६ वर्ष राहणार साईनाथ कॉलनी नंबर-०२, शेवाळवाडी पुणे. ता. हवेली जिल्हा पुणे.
महिला आरोपी नामे सिमा काकडे वय ४२ वर्ष दि. २६/०१/२०२४ रोजी दुपारी १२/२०. वा सुमारास अभयआगंण सोसायटी, नंदीनी टकले नगर, मांजरी ब्रु पुणे या ठिकाणी दि. २६/०१/२०२४ रोजी वा. फिर्यादी तक्रार देण्यासाठी आल्याने तात्काळ दाखल करण्यात आला. वरील प्रमाणे फिर्यादी हे अभय आगंण सोसायटी, नंदनी टकले नगर, मांजर बुद्रुक पुणे या ठिकाणी गेले असता फिर्यादी यांच्या तोंडओळखीचा व्यक्ती नाव गौरव हरपाल शर्मा वय- ३४, यांने मला " मुलगा सार्थक चांदणे याला नंदनी टकले नगर मांजरी च्या रोडवर पाठवयचे नाही तुम्ही जर सार्थक यास पाठविले की, तुम्हाला सोडणार नाही असे म्हणुन छिनाल, रंडी, हरामखोर, धंदा करणारी बाजारी बाई अशी वाईट शिवीगाळ केली " व फिर्यादी यांचा हात पकडुन डाव्या गालावर, पाठीवर हाताने मारहाण करुन मुलगा सार्थक गौरव शर्मा यास शिवीगाळ करुन कानाखाली मारली आहे व महिला सिमा काकडे फिर्यादी यांच्या अंगावर धावुन येवुन केस पकडुन गौरव शर्मा यांने हाताने मारहाण केली आहे व तेव्हा तेथेच रस्त्यावर पडलेली विट सिमा काकडे हिने उचलुन माझ्या पोटाच्या डाव्या बाजुच्या बरगडीवर मारली आहे. म्हणुन इसम नामे गौरव शर्मा यांने मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याने गौरव हरपाल शर्मा व महिला नामे सिमा काकडे यांच्या विरुध्द तक्रार केली म्हणून हा गुन्हा नोद करण्यात आली असे मांजरी बुद्रुक पोलीस चौकीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन दाभाडे यांनी सांगितले. आहे.
(टिप - वरील बातमी एफआआर नोंदीच्या आधारे आहे.)

Post a Comment