..यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मालकीची जमीन विकण्यासाठीच निवडणुकीचा घाट घातला जात आहे का? : आम आदमी पार्टी कडून प्रश्न उपस्थित ?
सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे हवेली: पुणे जिल्ह्यातील पुर्व वेली पट्यातील गेल्या १०-१५ वर्षांपासून यशवंत सहकारी साखर कारखाना बंद आहे.
या दरम्यानच्या काळामध्ये बीजेपी - शिवसेना आणि नंतर महाविकासचे सरकार येऊन गेले तरी कारखाना चालू करण्याचा प्रयत्न केला नाही. आता अचानक बीजेपी आणि सरकारमधील इतर पक्षांना जाग कशी आली ? या भागातील बहितांश राजकीय प्रतापित आता बीजेपी मध्ये गेले आहेत आणि काही बीजेपीच्या वाटेवर आहेत. म्हणून बीजेपीला या कारखान्यावर वर्चस्व मिळेल असे वाटत आहे. आणि म्हणूनच कारखान्याच्या निवडणुकीचा घाट घातला जात आहे.
हा कारखाना पुन्हा चालू करण्याची ईच्छा या भागातील एकही राजकीय व्यक्तीला नाही, आता त्यांचा डोळा फक्त कारखान्याच्या मालकीची जमील विकून त्यातून दलाली करून पैसे खायचे आहेत. हे म्हणजे प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्यासारखे आहे. कारखान्याच्या सर्व सभादांनी यावर विचार करायला हवा आणि यावर लक्ष ठेऊन या राजकारण्यांचा मानस हाणून पडायला हवा.
इतक्या वर्ष बंध ठेवलेला कारखाना फक्त राजकीय फायद्यासाठी आणि जमीन विकून दलाली मिळवण्यासाठी सुरु केलेले नाटक आहे. नागरिकांनी, शेतकर्यांनी सजग रहावे अशी माहिती सचिन कोतवाल, उपाध्यक्ष आम आदमी पार्टी पुणे शहर. यांनी दिली
..आम आदमी पार्टी च्या मागण्या खालील प्रमाणे ..
जर कारखान्याच्या मालकीची जमीन विकण्यात आली तर
👉🏻- त्यातून प्रथम कामगारांची थकीत देय द्यावी
👉🏻- नंतर सभासदांची थकीत बिले द्यावीत
👉🏻- उर्वरित पैस्यामधून कारखाना कमी क्षमतेने सुरु करावा आणि तो एखाद्या खासगी कंपनी ला भाडे तत्वावर चालवण्यास द्यावा. मालकी मात्र शेतकऱ्यांचिच ठेवावी
जर अदानी आणि इतर उद्यागपतींची कर्जे माफ केली जाऊ शकतात तर कारखान्यावर असेलेले कर्ज म्हणजे शेतकऱ्यांवर असलेले कर्ज आहे आणि म्हणून ते पूर्ण माफ करावे.



Post a Comment