गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : निरा-भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथील शहाजी केसरी कुस्ती आखाड्यात २०२४ वर्षातील महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख ठरला.
२०२४ च्या शहाजी केसरी कुस्ती गदेचा मानकरी. तर पैलवान माउली कोकाटे ठरला मानाच्या दुसर्या गदेचा मानकरी. शहाजी आखाड्यात रविवारी रात्री ८:३० वा.चे सुमारास महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पैलवान सिकंदर शेख विरूद्ध पैलवान भोला पंजाबी यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली.
सुरूवातीची तीन चार मिनिटे दोघांनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेण्यात घालवली. त्यानंतर सिकंदर शेख याने आक्रमक पवित्रा घेत भोला पंजाबीवर ताबा घेतला. व पुढील काही मिनिटात भोला पंजाबीला मोळी डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भोला पंजाबीच्या पायाला दुखापत झाल्याने कुस्ती दोन, ते तिन मिनिटे थांबविण्यात आली आणि शेवटी सिकंदर शेख याला विजयी घोषित करण्यात आले.
विजेता पैलवान सिकंदर शेख याला शहाजी केसरी कुस्तीची मानाची गदा व रोख रक्कम बक्षीस देवुन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
दोन नंबरची कुस्ती ही महाराष्ट्र चँम्पियन पैलवान माउली कोकाटे विरूद्ध २०२१ चा महाराष्ट्र केसरी पृथ्विराज पाटील यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीमध्ये माउली कोकाटे याने तीन मिनिटात पृथ्विराज पाटील याला आसमान दाखवत मैदानात उपस्थित असलेल्या विस ते पंचविस हजार कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले व शहाजी केसरी कुस्ती आखाड्यातील दुसर्या मानाच्या शहाजी केसरी गदेवर आपले नाव कोरले.
यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी माउली कोकाटे याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. तीसर्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या कुस्तीमध्ये पैलवान प्रकाश बनकर विरूद्ध पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत बर्याच वेळ चालली. त्यानंतर पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती गुण पद्धतीवर खेळविण्यात आली. त्यामध्ये महेंद्र गायकवाडने प्रकाश बनकरची पकड करत पहिला गुण घेवुन विजय मिळविला. या आखाड्यात २८ कुस्त्या मोठ्या व मानाच्या खेळविण्यात आल्या. तर आणखी दीडशे लहाण मोठ्या वजणाच्या कुस्त्या खेळविण्यात आल्या. त्यामध्ये विजेत्या व उपविजेत्या पैलवानास रोख रक्कम बक्षीस म्हणुन देण्यात आले.
या प्रसंगी डीवाय. एसपी तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, डीवायएसपी व अर्जुन पुरस्कार विजेता नरसिंग यादव, डीवायएसपी. तथा अर्जुन पुरस्कार विजेता राहुल आवारे तसेच अर्जुन पुरस्कार विजेते गुरूवर्य काका पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी निरा-भिमाचे चेअरमन लालासो पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ डोंगरे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मयुरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदिप जगदाळे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, पैलवान अस्लम काजी, उदयसिंह पाटील, पै.अशपाक मुलाणी, माजी सरपंच महेश जगदाळे, अमर जगदाळे यांचेसह निरा-भिमा चे सर्व संचालक मंडळ होते. याप्रसंगी कुस्ती निवेदक म्हणुन युवराज केचे, धनाजी मदने व शरद झोळ (सर) यांनी काम पाहीले. अखेर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.शहाजी आखाड्यात रविवारी रात्री ८:३० वा.चे सुमारास महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व संसदिय कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत पैलवान सिकंदर शेख विरूद्ध पैलवान भोला पंजाबी यांच्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती लावण्यात आली.
सुरूवातीची तीन चार मिनिटे दोघांनी एकमेकांच्या ताकतीचा अंदाज घेण्यात घालवली. त्यानंतर सिकंदर शेख याने आक्रमक पवित्रा घेत भोला पंजाबीवर ताबा घेतला. व पुढील काही मिनिटात भोला पंजाबीला मोळी डावावर चितपट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भोला पंजाबीच्या पायाला दुखापत झाल्याने कुस्ती दोन, ते तिन मिनिटे थांबविण्यात आली आणि शेवटी सिकंदर शेख याला विजयी घोषित करण्यात आले.
विजेता पैलवान सिकंदर शेख याला शहाजी केसरी कुस्तीची मानाची गदा व रोख रक्कम बक्षीस देवुन हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते सन्मानित करण्यात आले.
दोन नंबरची कुस्ती ही महाराष्ट्र चँम्पियन पैलवान माउली कोकाटे विरूद्ध २०२१ चा महाराष्ट्र केसरी पृथ्विराज पाटील यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीमध्ये माउली कोकाटे याने तीन मिनिटात पृथ्विराज पाटील याला आसमान दाखवत मैदानात उपस्थित असलेल्या विस ते पंचविस हजार कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचे पारणे फेडले व शहाजी केसरी कुस्ती आखाड्यातील दुसर्या मानाच्या शहाजी केसरी गदेवर आपले नाव कोरले.
यावेळी हजारो कुस्ती शौकीनांनी माउली कोकाटे याचे टाळ्यांच्या गजरात अभिनंदन केले. तीसर्या क्रमांकासाठी खेळविण्यात आलेल्या कुस्तीमध्ये पैलवान प्रकाश बनकर विरूद्ध पैलवान महेंद्र गायकवाड यांच्यात अटीतटीची लढत बर्याच वेळ चालली. त्यानंतर पंचाच्या निर्णयानुसार कुस्ती गुण पद्धतीवर खेळविण्यात आली. त्यामध्ये महेंद्र गायकवाडने प्रकाश बनकरची पकड करत पहिला गुण घेवुन विजय मिळविला. या आखाड्यात २८ कुस्त्या मोठ्या व मानाच्या खेळविण्यात आल्या. तर आणखी दीडशे लहाण मोठ्या वजणाच्या कुस्त्या खेळविण्यात आल्या. त्यामध्ये विजेत्या व उपविजेत्या पैलवानास रोख रक्कम बक्षीस म्हणुन देण्यात आले.
या प्रसंगी डीवाय. एसपी तथा ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी, डीवायएसपी व अर्जुन पुरस्कार विजेता नरसिंग यादव, डीवायएसपी. तथा अर्जुन पुरस्कार विजेता राहुल आवारे तसेच अर्जुन पुरस्कार विजेते गुरूवर्य काका पवार यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी निरा-भिमाचे चेअरमन लालासो पवार, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, सुवर्णयुग पतसंस्थेचे चेअरमन दशरथ डोंगरे, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती विलास वाघमोडे, इंदापूर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन मयुरसिंह पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदिप जगदाळे, महाराष्ट्र केसरी छोटा रावसाहेब मगर, पैलवान अस्लम काजी, उदयसिंह पाटील, पै.अशपाक मुलाणी, माजी सरपंच महेश जगदाळे, अमर जगदाळे यांचेसह निरा-भिमा चे सर्व संचालक मंडळ होते. याप्रसंगी कुस्ती निवेदक म्हणुन युवराज केचे, धनाजी मदने व शरद झोळ (सर) यांनी काम पाहीले. अखेर माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

Post a Comment