सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी पुरंदरच्या कन्या तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मांजरी खुर्द - विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी पुरंदरच्या कन्या तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने श्रीमती तृप्ती कोलते यांना या अप्पर तहसिल कार्यालयाच्या पहिल्या तहसीलदार होण्याचा बहुमान मिळाला आहे.
राज्य सरकारकडून २ नोव्हेंबरला हवेली तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन करून पूर्व हवेलीसाठी लोणीकाळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे बाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाने अप्पर तहसीलदार व महसूल सहाय्यक पद निर्माण झाले आहे. उपसचिव अजित देशमुख यांनी ३१ जानेवारीला श्रीमती तृप्ती कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश पारीत केले आहेत.
श्रीमती तृप्ती कोलते यांनी यापूर्वी वेल्हा, वाई, मुळशी येथे नायब तहसीलदार म्हणून तर सोलापूर, पुणे शहर, हवेली येथे तहसीलदार म्हणून काम केले आहे. मुळशी तालुक्यात कार्यरत असताना त्यांनी राज्यातील अभिलेख संगणीकरणाचा पायलट प्रकल्प यशस्वीपणे राबविला. त्यामध्ये चौदा लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणीकरण करण्याचे काम झाले. सध्या त्या मुंबई येथील रस्ते विकास महामंडळात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.
या नियुक्तीने पुर्व हवेलीत अभिनंदनाचा वर्षाव होणार यात शंका नाही. महाराष्ट्र पोलीस न्युज 24 च्या वतीने अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा......


Post a Comment