शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

यशवंत कारखान्याचा एक इंच तुकडाही न विकता कारखाना चालू करून दाखवतो : यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांचा सभासद यांना शब्द...

"यशवंत कारखान्याचा एक इंच तुकडाही न विकता कारखाना चालू करून दाखवतो" : यशवंत कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांचा  सभासद यांना शब्द...


सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) : थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून जनतेची फसवणूक करीत आहेत. परंतु, जनता सुज्ञ आहे. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल हे शेतकरी व संचालकाच्या हितासाठी उभे करण्यात आल्याने कारखान्यावर एक हाती वर्चस्व असणार आहे. यात शंका नाही.


         कारखान्याचा एक इंच तुकडाही न विकता कारखाना चालू करून दाखवितो, असे प्रतिपादन यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव अण्णा काळभोर यांनी केले.


           श्री चिंतामणी गणपतीला नारळ वाढवून अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या प्रचाराचा शुभारंभ गुरुवारी (ता. २९) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास झाला. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माधव अण्णा काळभोर बोलत होते. यावेळी के. डी. कांचन, दिलीप काळभोर, सुरेश घुले, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, रवींद्र कंद, उरुळी कांचनचे सरपंच भाऊसाहेब कांचन, थेऊरचे नवनाथ काकडे, राजाराम कांचन, महादेव कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, राजेंद्र कांचन, सनी उर्फ युगंधर काळभोर, लोचन शिवले, लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर, ललिता काळभोर, अलका कुंजीर, नागेश काळभोर, अमित काळभोर, कमलेश काळभोर, बाजीराव भालसिंग, राजेंद्र खांदवे, विकास तिखे आदी मान्यवर उपस्थित होते.


          यावेळी बोलताना माधव आण्णा काळभोर म्हणाले की, कै. अण्णासाहेब मगर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी हा कारखाना सुरु केला आहे. मात्र, २०११ साली कारखान्यावर प्रशासक असताना कारखाना बंद पडला. कारखाना सुरु व्हावा व शेतकऱ्यांचा विकास व्हावा, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सतत पाठपुरावा केला आहे. कारखाना सुरु करण्यासाठी शासन व इतर बँकांची आर्थिक मदत लागणार आहे.


             कारखान्याची निवडणूक लागली तर सुमारे १ कोटी रुपयांचा खर्च येईल. हा खर्च टाळण्यासाठी कारखान्याची निवडणूक बिनविरोध होणे गरजेचे होते. यासाठी ६ ते ७ वेळा सभा घेतल्या. परंतु दुर्दैवाने त्यात यश आले नाही. मात्र, विरोधकांनाच कारखान्याची निवडणूक लावायची असल्याने त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जनतेने कोणत्याही अफवांना बळी न पडता अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलच्या किटली चिन्हावर बटन दाबून सर्व उमेदवारांना भरघोष मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन माधव अण्णा काळभोर यांनी केले.

 

             या वेळी बोलताना सुरेश घुले म्हणाले की, कारखान्यावर पूर्वी जे संचालक झालेले पदाधिकारी आहेत, ते आणि त्यांच्या कुटुंबातील कोणी नको, अशी चर्चा कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी झाली होती. तसेच कारखाना सुरु करण्यासाठी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे सर्वोतोपरी मदत करायला तयार आहेत. ज्यावेळेस कारखाना बिनविरोध करायचा होता, तेव्हा जुन्यापैकी कोणी नाही, अशी आपली भूमिका होती. मात्र, एक-दोन जुनी माणसे त्यामध्ये आली म्हणून त्याच्यातून काही फरक पडणार नाही. कोणीतरी अनुभवी असावी लागते. त्यामुळे कारखान्यावर आपलाच विजय नक्की असणार आहे.


           लोणी काळभोरच्या माजी सरपंच माधुरी काळभोर म्हणाल्या की, यशवंत सहकारी साखर कारखाना म्हणजे हवेलीच्या पूर्व भागाचे भाग्यश्री आहे. मुळा-मुठा नदीच्या किनारी असणाऱ्या ऐतिहासिक थेऊर नगरीमध्ये स्वर्गीय अण्णासाहेब मगर आणि पद्मश्री मनीबाई देसाई यांच्या दूरदृष्टीने आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण  यशवंतची मुहूर्त मेढ रोवत यशवंत कारखान्याची कोनशीला बनवली. शेतकरी सभासदांच्या आशीर्वादाने यशवंतचे विकासाचे गंगा एकमेव फक्त अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल करेल. कारखान्याची चिमणी पेटवण्याचे काम हे आमच्या पॅनेल प्रमुखांनी अगदी मनावर घेतलेले आहे. विजयाचा गुलाल आपण याच परिसरात निश्चित उधळविणार आहोत. यामध्ये काडी मात्र शंका नाही.


           या वेळी बोलताना महादेव कांचन म्हणाले की, कारखान्यावर १५ वर्षे या ठिकाणी संचालक म्हणून काम केले आहे. यशवंत कारखान्याला माझे दैवत मानतो. आजही १५ किलोमीटरच्या परिसरातील शेतकरी आपल्याकडेच येणार आहेत. कारण या निवडणुकीत १ हजार मतांच्या फरकाने शंभर टक्के आम्ही निवडून येणार आहोत.


           या वेळी बोलताना प्रकाश म्हस्के म्हणाले की, आपले जे उमेदवार आहेत ते सर्व चांगल्या प्रकारे सुशिक्षित आहेत. त्यांना सर्वांनी एकमताने निवडून द्या. कारखाना उत्तम पद्धतीने कसा चालवायचा याच्याबद्दल मला अधिक माहिती आहे. त्यामुळे आपण निश्चितच कारखाना चालू करू. असा विश्वास व्यक्त केला.


          दिलीप काळभोर म्हणाले की, यशवंत सहकारी साखर कारखाना तेरा वर्षांपूर्वी बंद पडला होता. त्यावेळी कारखाना प्रशासकाच्या ताब्यात होता. तेव्हा कारखाना बंद पडला आहे. कारखान्यावर कर्ज असल्याने कारखाना बँकेच्या ताब्यात आहे. पहिले बँकेचे कर्ज भरल्यानंतरच कारखाना सुरु होणार आहे. त्यासाठी तालुक्यातील संस्थांच्या माध्यमातून कर्ज घेऊन कारखाना चालू करणार आहे. त्यामुळे अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनलच्या सर्व सभासदांना निवडून द्या. व परिसरातील कायापालट करुयात.


           सुदर्शन चौधरी म्हणाले की, सहा नंबरमध्ये यावेळेस नक्की इतिहास घडणार आहे. विरोधकांचा पॅनेल हा शेतकरी विकास आघाडी नाही, तर व्यापारी विकास आघाडी आहे. त्यामुळे जनतेने रयत सहकार पॅनेलला मतदान करून मोठ्या मताधिक्क्याने विजयी करावे. असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post