अवैध धंदे बंद करण्यासाठी उपोषण करायची वेळ साबेरखां पठाण यांच्यावर...; सिंदखेडराजा तालुक्यातील घटना, वरिष्ठ पोलीस अधिकारी उपोषण करायची वाट पाहतात आणि अवैध धंदे बंद करतात.
गंगाराम उबाळे (प्रतिनिधी)
महाराष्ट्र पोलीस न्युज
बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा, पोलिस स्टेशन अंतर्गत अवैध व्यावसायिकांमधील स्पर्धा वाढली आहे.
अवैध धंदे बंद करा, या मागणीसाठी बसस्थानकावर भाजपचे साबेरखां पठाण यांनी उपोषण सुरू केले. आज दुपारी भाजपचे नेते तथा माजी आ. तोताराम कायंदे, जिल्हा सरचिटणीस रावसाहेब देशपांडे, तालुकाध्यक्ष प्रभाकर ताठे, अल्पसंख्याक आघाडीचे तालुकाध्यक्ष शेख जावेद यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मागणीबाबत ठाणेदार स्वप्निल नाईक यांच्याबरोबर चर्चा केली. त्यानंतर मिळालेल्या आश्वासनामुळे उपोषणाची संपविण्यात आले.
मागील अनेक दिवसांपासून पोलिस स्टेशनअंतर्गत अवैध धंदे बंद आहेत. चोरून कुणी अवैधरित्या धंदा करीतच असेल तर माहिती मिळताच तत्काळ कारवाई करण्यात येईल असे ठाणेदार स्वप्निल नाईक यांनी स्पष्ट सांगितले. भाजपचे पदाधिकारी यांची खात्री झाल्यानंतर माजी आमदार तोताराम कायंदे, रावसाहेब देशपांडे, प्रभाकर ताठे यांच्या हस्ते रस पिऊन साबेरखा पठाण यांनी उपोषण सोडले.
साखरखेर्डाःयेथे उपोषणकर्ते साबीर खा व उपोषण सोडवतांना तोताराम कायंदे व रावसाहेब देशपांडे. यांनी उपोषण सोडले. येथील पोलिस स्टेशनअंतर्गत मलकापूर- पांग्रा, आंबेवाडी, शेंदूर्जन, गोरेगाव, साखरखेडा, हिवरा आश्रम आदी ठिकाणी सुरू असलेले सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्यात आल्याची माहिती यावेळी ठाणेदार नाईक यांनी उपस्थितांना दिली.


Post a Comment