शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

एसीबी'च्या कारवाईनंतर मंडालाधिकारी फरार‌..; अखेर लाच स्विकारल्यानंतर ही फरार झाल्याने कारवाई संशयास्पद असल्याची शंका...

 ..लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच झाल्या फरार..

..'एसीबी'च्या कारवाईनंतर थेऊरमध्ये फटाके फोडून जल्लोष..

.. एसीबी च्या कारवाई नंतर फरार झाल्याने कारवाई संशयास्पद..


पुणे हवेली (प्रतिनिधी) : सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद मंजूर करण्याच्या नावाखाली शेतकऱ्याकडून सात हजार रुपयांची लाच स्विकारल्या प्रकरणी थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे व त्यांच्या दोन खासगी इसमांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. 


          एसीबीने केलेल्या कारवाईमुळे नागरिकांनी थेऊरमध्ये फटाके फोडून मोठा जल्लोष केला आहे.


            लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयश्री कवडे यांच्यासाठी सात हजाराची लाच स्विकारणाऱ्या योगेश तातळे व विजय नाईकनवरे या दोघांना रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जयश्री कवडे यांच्या दोन बगलबच्च्यांना अटक केली असली, तरी गुन्हा दाखल होत असताना खुद्द जयश्री कवडे मात्र फरार होण्यास यशस्वी ठरल्या आहेत. एसीबी च्या कारवाई नंतर मंडालाधिकारी फरार कशा काय होतात याचे गुण उपकरणे गरजेचे आहे. मंडालाधिकारी यांची खाते निहाय चौकशी करून दंडात्मक कारवाई करण्यात यावी असे थेऊर परिसरातील नागरिक आपापसात चर्चा करत आहेत.


           मिळालेल्या माहितीनुसार, हवेली तहसीलदार कार्यालयाने वरील प्रकरणातील तक्रारदार यांच्या सातबारावर झालेल्या चुकीच्या दुरुस्ती कामी पारित केलेल्या १५५ च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोलवडी तलाठी व थेऊर मंडलाधिकारी यांना आदेशित केलेले होते. वरीष्ठांच्या आदेशानुसार कोलवडी गावच्या तलाठ्यांनी याबाबतची फेरफार नोंद घेतलेली होती. संबंधित फेरफार आदेशाची नोंद एकाच दिवसात मंजूर करता येते. मात्र, आर्थिक प्रोटोकॉलसाठी मंडल अधिकारी जयश्री कवडे यांनी ती फेरफार नोंद मंजूर करण्यास दिरंगाई लावत तक्रारकदाराची फेरफार नोंद प्रलंबित ठेवली होती. 


             ती फेरफार नोंद मंजूर करणेकामी त्यांच्या खाजगी इसमांमार्फत तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची लाच मागितली होती.


            तहसीलदार कार्यालयाचे आदेश असतानाही काम होत नसल्याने चिडलेल्या तक्रारदाराने याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली होती. सदर तक्रारीची पडताळणी एसीबी विभागाने पंचासमक्ष केली होती. अखेर मंगळवारी (ता. 13) रात्री उशीरा तक्रारदाराकडून तडजोड अंती सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना तातळे व नाईकनवरे या दोघांना ताब्यात घेतले. या कारवाईची कुणकुण लागल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी जयश्री कवडे यांच्यापर्यंत पोहचण्यापुर्वीच त्या मोबाईल स्विच ऑफ करुन फरार झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post