शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णेत....

 ....राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णेत....


गजानन टिंगरे (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज


पुणे (इंदापूर) : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे येथे ३/३/२०२४ रोजी राबविण्यात आली.


             सकाळी लसीकरणाचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष भाजपा ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा माननीय गजानन ( भाऊ) वाकसे व सरपंच सागर भैय्या पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा लोंढे यांच्या हस्ते करण्यात आला. 


      यावेळी आरोग्य निरीक्षक चोरमले बी.आर.,स्टाफ नर्स-भारती गायकवाड, आशाताईं उर्मिला खताळ, वनिता होले, सुरेश निंबाळकर, बनन करे परिचर यांच्या बरोबर पालक वर्ग व बालके मोठ्या संखेने उपस्थित होते.


           प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर्णे अंतर्गत उपकेंद्र कार्यक्षेत्रामध्ये ३८ ठिकाणी पल्स पोलिओ लसीकरण बुथ तयार केले असून त्या ठिकाणी ५९ कर्मचारी  कार्यरत आहेत अपेक्षित एकूण लाभार्थी (३३१९) तीन हजार तीनशे एकोणीस बालकांना पोलिओ लसीकरण करण्याचे नियोजन केले. आरोग्य विभागाने केलेले असल्याची माहीती डाॅक्टर प्रज्ञा लोंढे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post