शोध सत्याचा त्याला... वास्तवाची धार...

लिंबू, मिरची, भाकरीचा उतारा ठेऊन उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न... यशवंत कारखान्याचा निवडणुकीतील प्रकार...

 .....आण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलचे उमेदवार नवनाथ काकडे यांच्या घराजवळ भानामती करण्याचा प्रयत्न...

            लिंबू, मिरची, भाकरीचा उतारा ठेऊन उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न... यशवंत कारखान्याचा निवडणुकीतील प्रकार....


                           ...संग्रहित फोटो...

सुनिल थोरात (संपादक)

महाराष्ट्र पोलीस न्युज 


पुणे (हवेली) अष्टविनायक गणपती मधील एक असलेल्या थेऊरचा चिंतामणी येथील यशवंत सहकारी कारखान्याची निवडणूक लागली. चर्चा, वाटाघाटी झाल्या अखेर उमेदवार ठरले. आणि प्रचाराचा नारळ फुटला. प्रचार चालू असताना उमेदवार आपापल्या पद्धतीने प्रचार करत असताना पराभवाच्या भितीने भानामती करण्याचा प्रकार करण्यात आला. परंतु मतदानाच्या आधीच विरोधकांना पराभूत होण्याची चिंता लागली असावी याच चिंतेने अण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनलच्या घराजवळ लिंबू, मिरची, भाकरीचा उतारा निवडणुकीच्या प्रचार-पत्रकावर ठेवण्यात आला.


            यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी दोन्ही पॅनेलचे ४२ उमेदवार वगळता इतर १२ उमेदवार रिंगणात आहेत त्या उमेदवारांनी आपल्याच पॅनेलला पाठिंबा द्यावा यासाठी दोन्ही पॅनेलच्या वतीने जोरदार प्रयत्न करत आहेत.


             निवडणुकीत सभासदांचा आण्णासाहेब मगर रयत विकास पॅनेलला वाढता कल पाहता आण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी पॅनेलचा मोठ्या फरकाने पराभव होईल अशी चर्चा मतदार यांच्यामध्ये पाहायला मिळते.


            थेऊर ग्रामपंचायतचे माजी सरपंच व आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे उमेदवार नवनाथ काकडे यांचा येणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखाना निवडणूकीत पराभव होणायासाठी चक्क भानामती केल्याचा प्रकार समोर आल्याने हवेली तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. पराभवाच्या भितीने हा प्रकार केल्याची शंका व्यक्त होत आहे.

      

        (आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचा अशा लिंबू, मिरची उतार्याने काहीही फरक पडणार नाही मतदारांबरोबर स्थानिक पदाधिकारी यांचा ही अधिकृत पाठिंबा पॅनलला आहे. असे पॅनल प्रमुख माधव अण्णा काळभोर व प्रचार प्रमुख महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, सभासद दिलीप काळभोर यांनी विश्वास व्यक्त केला.)


     

...आण्णासाहेब मगर रयत सहकारी पॅनेलचे प्रमुख माधव अण्णा काळभोर...

Post a Comment

Previous Post Next Post