....शेतकरी विकास आघाडी नसून "व्यापारी विकास आघाडी" : सुदर्शन जयप्रकाश चौधरी...संचालक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, सचिव पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, माजी सरपंच सोरतापवाडी....
सुनिल थोरात (संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (हवेली) : शेतकऱ्यांच्या हिताला महत्त्व देण्यापेक्षा व्यापाऱ्यांच्या हिताला महत्त्व देणारी मंडळी यशवंतच्या निवडणूक रिंगणात उतरली आहेत. गेली १० महिन्यात मार्केट कमिटी संचालक म्हणून कुठलेही प्रभावी काम यांना करता आले नाही या उलट मार्केट कमिटी मध्ये होणाऱ्या प्रत्येक चांगल्या कामाला विरोध करुन यांनी कायम शेतकरी विरोधी धोरण अवलंबले आहे. आता हीच मंडळी शेतकरी विकास आघाडी पॅनलच्या माध्यमातून आम्ही कारखाना सुरू करू शकतो अशा वलगना करीत आहेत. मुळात ही शेतकरी विकास आघाडी नसून "व्यापारी विकास आघाडी" आहे. असा घाणाघात सुदर्शन चौधरी यांनी केला.
यशवंत चालू करू शकतील अशी सक्षम मंडळी रयत सहकार पॅनल मध्ये आहेत. म्हणून आम्ही ज्येष्ठ नेते माधव आण्णा काळभोर, दिलीप दादा काळभोर, सुरेश आण्णा घुले, महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर, रोहिदास शेठ उद्रे यांच्या नेतृत्वातील रयत सहकार पॅनल बरोबर भक्कमपणे उभे आहोत. राजीव घुले पाटील यांचे स्वतःचे दोन कारखाने आहेत व आज रयत पॅनलचे माध्यमातून उमेदवार म्हणून रिंगणात उभे आहेत. त्यांच्या अनुभवाचा यशवंत चालू करण्यासाठी नक्कीच फायदा होईल.
यशवंत चालू करण्यासाठी सरकारची मदत लागणार आहे. सर्वपक्षीय अशा रयत सहकार पॅनलच्या माध्यमातून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत.
भाजपचे रोहिदास शेठ उद्रे, संदीप आप्पा भोंडवे, रवींद्र कंद, तालुकाध्यक्ष श्यामराव गावडे, अजिंक्य कांचन, नवनाथ काकडे, कमलेश काळभोर अशी सर्व मंडळी रयत सहकार पॅनल सोबत आहोत.
आमचे नेते दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल दादा कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप दादा कंद यांच्यामार्फत भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कारखाना सुरू करण्यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करणार आहोत.
सध्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीकडे १७० कोटी शिल्लक ठेव भाग भांडवल आहे. पुण्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे गुलटेकडी येथील मार्केट यार्ड येथे अनेक समस्या उत्पन्न होत आहेत. त्यातच बाजार समिती जर शहरात राहिली तर तिचे राष्ट्रीयकरण होण्याची दाट शक्यता आहे. भविष्यात पुण्याचा मुख्य बाजार जर थेऊर येथील जागेत हलवला तर शेतकयांच्या दोन्ही संस्था एकाच ठिकाणी होतील व मार्केट कमिटीच्या माध्यमातून कारखाना उभा करण्यासाठी समितीच्या माध्यमातून आर्थिक मदत करता येईल असा प्रस्ताव रयत सहकार पॅनलच्या नेते मंडळींना आम्ही दिला आहे. तालुक्याच्या दोन्ही शेतकरी संस्था एकाच ठिकाणी आल्याने शेतकऱ्यांची सोय होईल,
नाशिक मध्ये एका पतसंस्थेमार्फत तेथील स्थानिक आमदाराने कारखाना चालवायला घेतला आहे, याच धर्तीवर यशवंतच्या बाबतीत बाजार समिती निर्णायक भूमिका घेऊ शकते.
सुदर्शन चौधरी पुढे म्हणाले माझे आजोबा स्वर्गीय भाई के. डी. चौधरी कारखान्याचे संचालक व व्हाईस चेअरमन होते त्याचबरोबर माझे वडील जयप्रकाश चौधरी व चुलते अरविंद चौधरी हे संचालक होते. मी स्वतः सभासद असून यशवंत निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी अथक प्रयत्न घेतले.
व्यापारी विकास आघाडीच्या नेतेमंडळींना जनता त्यांची जागा दाखवणार हे नक्की. मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी सभासदांना कळकळीची विनंती करतो की यशवंत सुरू करू शकतील अशा सामर्थ्यवान रयत सहकार पॅनलला किटली या चिन्ह समोर शिक्का मारून प्रचंड बहुमतेने विजयी करा धन्यवाद.
(सुदर्शन जयप्रकाश चौधरी (संचालक पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती, सचिव पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टी, माजी सरपंच सोरतापवाडी.)



Post a Comment