..उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इंदापूर तालुका भारतीय जनतापक्षांच्या वतीने धनगरी घोंगडी देवून जाहीर सत्कार करण्यात आला....
गजानन टिंगरे (पुणे संपादक)
महाराष्ट्र पोलीस न्युज
पुणे (इंदापूर) : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभेच्या आचारसंहिते नंतर राजकीय बैठका व घडामोडींना प्रचंड वेग आला असून, बारामती लोकसभेकडे संपुर्ण महाराष्ट्राचे विशेष लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाने मागील वर्षांत संपुर्ण लक्ष या मतदारसंघावर केंद्रीत केले होते.
परंतू अनपेक्षित पणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर युतीत सहभागी झाले. व पारंपरिक राजकीय विरोधक असलेल्या नेत्यांना अखेर एकञ काम करान्याची वेळ आली.
इंदापूर विधानसभेत अद्याप नेते, कार्यकर्ते यांचे मनोमिलन झाले नाही. ते होण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (दि.२९) रोजी मुंबई येथील सागर बंगला निवासस्थानी हर्षवर्धन पाटील सह इंदापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीकडून दिलेल्या उमेदवाराचा सर्वानी प्रचार करुन दिलेल्या उमेदवाराला विजयी करा असे स्पष्ट संदेश दिला.
यावेळी इंदापूरचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वात, पृथ्वीराज जाचक, गजानन वाकसे, नाना शेंडे, लाला आबा पवार, बाबा महाराज खारतोडे, शेखर पाटील, व इतर कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले.
यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोगतात सांगितले की इंदापूर तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांचे पालकत्व माझ्याकडे आहे तुम्ही निश्चितच रहा. या नंतर फडणवीस यांनी निवडणूकीसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या पुणे जिल्हा दक्षिणच्या संघटनात्मक कामाचा आढावा सरचिटणीस आकाश कांबळे व ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष गजानन वाकसे यांच्याकडून घेतला यावेळी रमेश चांदगुडे यांच्यासह तालुक्यातील प्रमुख नेते बैठकीस आमंत्रीत होते.



Post a Comment